Pune Crime News | वाकड येथील महार वतनाची 70 एकर जमीन परस्पर हडपली; नावावर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना धमकी, 12 जणांवर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | वाकड येथील महार वतीनाची ७० एकर २६ गुंठे जमीन समस्त महार वाकड यांना शासनातर्फे इनामी दिली असतानाही ही जमीन बनावट कागदपत्रांद्वारे (Fake Document) तत्कालीन महसुल अधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, गाव तलाठी यांना हाताशी धरुन बेकायदेशीरपणे स्वत:च्या नावाने करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जमिनीबाबत कार्यवाही करत असल्याने शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याच्या (Threats to kill) धमक्या दिल्या जात आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Pune Police) १२ जणांवर फसवणुकीबरोबर (Cheating Case) अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत विजय निवृत्ती वाघमारे (वय ६०, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९४४/२३) दिली आहे. त्यानुसार साहेबराव भाऊसाहेब कलाटे (Sahebrao Bhausaheb Kalate) यांचे वारस, घनश्याम जंगलदास सुखवाणी, मनसुखलाल उमेदमल कुंकलोक, महेंद्र मनसुखलाल कुंकलोक, नरेंद्र मनसुखलाल कुंकलोक, रवींद्र मनसुखलाल कुंकलोक, काशीपाटील रामभाऊ कलाटे, विनायक रामचंद्र जाईल, शाम हनुमंत वाकडकर, हरिश गोपाळसिंग राजपुरोहित, विनोद प्रेमचंद चांदवाणी, मारुती दामु जमदाडे यांचे वारस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे वडिल व आजोबा त्यांना आपल्या पूर्वजांना वाकड गावठाणालगत ७० एकर जमीन इनामी म्हणून मिळाली होती. परंतु, या जमिनीबाबत कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. २५ वर्षांपूर्वीपासून फिर्यादी या जमिनीबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी वाकड येथील सर्व्हे नं. १, ४३, ४४ या सर्व्हे नंबरमध्ये असलेली सुमारे ७० एकर जमीन महार वतन म्हणून त्यांच्या पूर्वजांना अदा करण्यात आली होती. ती आता संवर्ण लोकांच्या नावे असल्याचे लक्षात आले. त्यांनी जमिनीचा जुना अभिलेखा प्राप्त करण्याकरीता पुरालेखागारचे सहायक संचालक यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार वाकड येथील ७० एकर २६ गुंठे जमीन समस्त महार वाकड यांना शासनातर्फे इनामी देण्यात आलेली आहे, असे दिसून आले. यावर वारस नाव लावण्याकरीता मुळशी तहसिलदारांकडे (Mulshi Tehsildar) अर्ज केला. त्यावर कार्यवाही केली गेली नाही. फिर्यादी यांना राष्ट्रीय अनुसुचित जाती जमाती आयोगाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत जमीन महसुल रजिस्टरी १९४१ -४२ पासून इतर इसमांच्या नावाच्या नोंदी दिसून येत आहे.

जमीन अ‍ॅलिनेशन रजिस्टरला समस्त महार यांचे नावे असल्याचे दिसून येते. मात्र ७/१२ वर नावे नाही.
त्यात फिर्यादींची वडिलोपार्जित इनाम वर्ग ६ बची जमीन संवर्ण वर्गातील लोकांनी कोणत्याही सक्षम प्राधिकारी
यांची कोणत्याही पूर्व परवानगी न घेता जमीन खरेदी केल्याचे दिसून येत आहे.
त्यानुसार त्यांच्या वारसाच्या या मिळकतीच्या ७/१२ उताºयावर नोंद झाल्याचे दिसून येत आहे.
फिर्यादी यांचे पूर्वज यांनी कधीही कुणाकडे दान, गहाण, बक्षीसपत्र, करार, मदार, विकसन करार आणि कोणत्याही
प्रकारचे अधिकार व हक्क म्हणजेच कुलमुख्यारपत्र कधीही कुणालाही दिलेले नाहीत. ही जमीन संवर्ण लोकांनी
महार वतन बाबतचे सरकारी चलन न भरता त्यांचे नावाने ७/२३ नोंद करुन घेतल्याचे दिसून आलेले आहे. महसुल अधिकार्‍यांना हाताशी धरुन ही महार वतनाची जमीन बळकावलेली आहे, असा अहवाल देण्यात आला आहे. यामुळे आपल्याला जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या
ऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे;
प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी.
पर्यायी रस्ता तयार होणार !