Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या ऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे; प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी. पर्यायी रस्ता तयार होणार !

प्रकल्पासाठीचा खर्च आणि कालव्याच्या जागेच्या वापराबाबत अभ्यास करण्यात येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) कालव्याद्वारे होणार्‍या पाणी पुरवठ्यातून होणारी गळती थांबविणे तसेच प्रदुषण कमी करण्यासाठी बंद पाईपलाईनद्वारे फुरसुंगी येथे बोगद्यातून पाणी न्यायच्या प्रकल्पाचे आणखी एक पाउल पुढे पडले आहे. बावीसशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक झाली. या प्रकल्पासाठीचा खर्च कसा उभारायचा यावर प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच पुण्यामध्ये बैठक घेण्याचे ठरले, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Khadakwasla To Phursungi Water Tunnel )

खडकवासला धरणातून शेतीसाठी मुठा उजव्यातून पाणी सोडण्यात येते. याच कालव्याद्वारे गेल्या काही वर्षांपर्यंत पुणे शहरालाही पाणी पुरवठा होत होता. कालवा अत्यंत जुना झाला असून गळती आणि बेकायदा उपश्यामुळे कालव्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्यापैकी तीन टीएमसी पाणी वाया जाते. दुसरीकडे पुण्याची लोकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही वाढत असून शहराला पाणी पुरवठ्यासाठी नव्याने धरण बांधण्यासाठी जागेची मोठी अडचण आहे. या पार्श्‍वभूमीवर कालव्यातून होणारा पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मागील काही वर्षांपासून बंद पाईपलाईन तसेच फुरसुंगी येथे बोगदा बांधून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. गेली काही वर्षापासून हा अहवाल शासन दरबारी पडून आहे. (Khadakwasla To Phursungi Water Tunnel)

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी पुरवठ्याचे पडून असलेले अहवाल पुन्हा चर्चास्थानी आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठक बोलविली होती. या बैठकीला पाटबंधारे विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता कपोले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे (PMC City Engineer Prashant Waghmare) यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अहवाला नुसार सध्याचा कालवा बंद करून बंद पाईपलाईन द्वारे फुरसुंगीपर्यंत पाणी नेण्याची योजना आहे.
या प्रकल्पामध्ये फुरसुंगी येथे बोगद्याही खोदण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी बावीसशे कोटी रुपये खर्च आहे.
हा खर्च कसा उभारायचा यावर या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. सध्याचा मुठा उजव्या कालव्याची जागा पाटबंधारे विभागाची आहे. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत सुमारे २७ कि.मी. कालवा आहे.

या जागेचा वापर रस्ता, उड्डाणपुल अथवा मेट्रो मार्गीका अशा कोणत्या पद्धतीने अधिकाअधिक चांगला राहील,
याचाही अभ्यास करण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला.
लवकरच यासंदर्भातील अभ्यासावर आधारीत अहवाल तयार करून त्यावर नजीकच्या काळात बैठक घेउन
पुढील निर्णय प्रक्रिया करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या’ बावनकुळेंच्या विधानाची क्लिप व्हायरल, विरोधकांनी उठवली टीकेची झोड

BJP On Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘तुम्ही ज्या इंडी आघाडीत आहात त्यांनी 14 पत्रकारांवर…’

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित मराठी हास्य कवी
संमेलनामध्ये पुणेकरांवर आणि महिलांवर केलेल्या विनोदी रचनांनी एकच हाशा पिकला