Pune Crime News | सख्खा मित्रच निघाला वैरी…! घेतलेले उसने पैसे मागितल्याने मित्राला संपवलं, आरोपींना अटक

पुणे: Pune Crime News | उसने घेतलेले पैसे बरेच दिवस होऊन परत न देता दोन मित्रांनी मित्राची हत्या (Murder in Pune) केल्याचे उघड झाले आहे. उसण्या पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले असून या प्रकरणात दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Pune Crime News)

अक्षय होळकर Akshay Holkar ( वय ३०) आणि समीर शेख Sameer Sheikh (वय ४३) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दत्तात्रय पिलाने (Dattatraya Pillane) याची हत्या केली आहे. भोर पोलिसांनी (Bhor Police) सखोल तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोर पोलिसांना (Pune Rural Police) १७ मार्च रोजी भोर (Bhor Crime News) महाड रस्त्यावर एक अनोळखी मृतदेह सापडला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, दतात्रय पीलाने याच्याकडून अक्षय होळकर याने पाच ते सहा लाख रुपये उसने घेतले होते.
पैसे घेऊन अनेक दिवस झाल्याने दतात्रय याने अक्षय याच्याकडून पैशांची मागणी करू लागला. मात्र अक्षयच्या डोक्यात दत्तात्रय याला संपवण्याचा प्लॅन आला. त्यानुसार १० मार्च रोजी अक्षय याने द त्तात्रय याला बोलवून घेतले. त्यानंतर त्याला गाडीत बसवून त्याच्यावर गाडीतच चाकुने, हातोडीने घाव घालत त्याचा खून केला. अक्षय याने त्याचा मित्र समीर याच्या मदतीने हा खून (Bhor Murder News) केला. त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरचे कपडे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा मृतदेह वरांधा घाटातील वारवंड गावाच्या हद्दीत फेकून दिला. त्यानंतर पोलिसात दत्तात्रय हरावला असल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिस शोध घेत असताना त्याचा मृतदेह १७ मार्चला सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. (Pune Crime News)

त्यानंतर पोलिसांनी पुणे आणि सातारा या ठिकाणी हरवलेल्या व्यक्तींची माहिती मिळवली.
त्यानंतर सिंहगड पोलिस स्टेशन (Sinhagad Police Station) मध्ये दत्तात्रय पिलाने मिसिंग असल्याचे समजले.
त्यानुसार पोलिसांनी त्याच्या वडिलांकडे चौकशी केली. त्याला त्याचा मित्र अक्षयने बोलवून घेतले होते.
त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी अक्षय आणि त्याच्या मित्रावर गुन्हेशाखेच्या मदतीने पाळत ठेवली.
त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी खक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली.
भोर पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title :- Pune Crime News | A good friend turned out to be an enemy…! The friend was killed for asking for borrowed money, the accused were arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shambhuraj Desai | कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

Pune Crime News | आईनेच केला पोटच्या ४ वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून; हडपसरमधील ससाणेनगर येथील धक्कादायक घटना

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील