Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून ‘मर्डर’मधील आरोपींना 7 तासाच्या आत अटक

0
933
Pune Crime News | Accused in 'Murder' arrested by Dattawadi Police within 7 hours
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) खूनाच्या गुन्हयातील आरोपींना अवघ्या 7 तासाच्या आत अटक केली आहे. अरबाज मेहबूब शेख (25, रा. रूम नंबर 304, अमिना टॉवर्स बिल्डींग, गुरूनानक नगर, एस.आर.एस. स्कीम, भवानी पेठ) आणि मुखीम गफूर शेख (23, रा. रूम नं. 2, गल्ली नं. 31, मिठानगर, मक्का मस्जिदजवळ, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

 

सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपावर फिर्यादी आणि त्यांचा भाऊ किरण राजु दांडेकर व इतर दोघे हे रिक्षात गॅस भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी रिक्षाचा दुचाकीस्वारास धक्का लागला. दोघांनी रिक्षामधील किरण दांडेकरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आरोपी अरबाज आणि मुखीम हे पळून गेले होते. आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे आणि त्यांच्या पथकातील पोलिस नाईक प्रकाश मरगजे आणि पोलिस अंमलदार किशोर वळे यांनी आरोपींचा माग काढला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना अटक केली. (Pune Crime News)

 

अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलिस अंमलदार प्रकाश मरगजे, किशोर वळे, कुंदन शिंदे, अमित सुर्वे, अमित चिहे, सद्दाम शेख, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, प्रमोद भोसले, पुरूषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, नवनाथ भोसले आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.

 

Web Title :- Pune Crime News | Accused in ‘Murder’ arrested by Dattawadi Police within 7 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस