Pune Crime News | 50 लाखांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील (Murder Case) पॅरोलवर असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला 50 लाखांची खंडणी (Extortion) मागितल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) पानशेत गाव येथे केली आहे.

रोहित शंकर पासलकर Rohit Shankar Pasalkar (वय-23 रा. मुपो रुळे-मोरदरी, ता. वेल्हे, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) आयपीसी 387, 506(2), 323, 143, 144, 147, 148, 149, 504, 506, सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. (Pune Crime News)

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station) व उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार श्रीकांत दराडे (Police Constable Srikant Darade) यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पानशेत गाव येथे त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior PI Ashok Indalkar),
पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील, गणेश ढगे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maratha Reservation Protest | जालन्यातील घटना दुर्दैवी, जखमींची शासनाच्या वतीने माफी मागतो – देवेंद्र फडणवीस

Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी नागरिकांची फसवणूक, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक; 43 लाखांची 7 वाहने जप्त