Pune Crime News | …अन् त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बस्स ! वानवडी पोलिसांकडून गहाळ झालेले 16 मोबाईल नागरिकांना सुपूर्द

नागरिकांनी पुणे शहर पोलिस दलाचे मानले आभार, दिले धन्यवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वानवडी पोलिस ठाण्यातील (Wanwadi Police Station) पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी गहाळ (Mobile Missing – Mobile Theft) झालेले 16 मोबाईल मिळवून ते ज्यांचे आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे. हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद यावेळी पहावयास मिळाला. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रवासादरम्यान व विविध ठिकाणाहून मोबाईल गहाळ झाल्याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात ऑनलाईन तक्रारी तसेच सीईआरआर या पोर्टलवरून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी गहाळ झत्तलेल्या मोबाईल हॅन्डसेटचे आयएमईआय नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून हरवलेले मोबाईल ज्यांच्याकडे आहेत त्यांना संपर्क साधून ते परत मिळवले. वानवडी पोलिसांनी एकुण 2 लाख 20 हजार रूपये किंमतीचे 16 मोबाईल परत मिळवून ते मुळ मालकाच्या स्वाधीन केले. (Pune Crime News)

 

हरवलेले अन् गहाळ झालेले मोबाईल पुन्हा एकदा मिळाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर एक आगळा-वेगळा आनंद यावेळी पहावयास मिळाला. दरम्यान, मोबाईल हरविल्यानंतर संबंधितांनी त्याबाबतची तक्रार पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड वर तसेख शासनाच्या सीईआयआर या पोर्टलवर (Mobile Missing Complaint Online) तात्काळ करावी असे अवाहन पुणे शहर पोलिसांकडून (Pune City Police) करण्यात आले आहे.

हरवलेले आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार
(IPS Ritesh Kumar) , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Ritesh Kumar),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma),
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve)
यांची वानवडी पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Patare), तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane), सायबर तपास पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक सोनालिका साठे (PSI Sonalika Sathe), पोलिस हवालदार अतुल गायकवाड, राहुल गोसावी, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड, निळकंठ राठोड, सुजाता फुलसुंदर आणि सोनाली वाकसे यांनी मिसिंग मोबाईल्सचा शोध घेवून ते मुळ मालकांना परत केले आहेत.

ज्यांचे मोबाईल हरवले होते आणि ते मोबाईल त्यांना पोलिसांनी परत दिले अशा नागरिकांनी पुणे शहर पोलिस दलाचे आभार मानले. त्यांनी वानवडी पोलिसांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

 

Web Title : Pune Crime News | …and the joy on their faces! 16 missing mobile phones handed over to citizens by Wanwadi police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा