Bipasha Basu | बिपाशा बासु कायम सोबत ठेवते हातोडा; एका प्रसंगाची मनात आहे भिती

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा एक काळ गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री बिपाषा बासु (Bipasha Basu) ही हॉट अभिनेत्रीं पैकी होती. आज जरी ती मोठ्या पड्द्यावर झळकत नसली तरी तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. बिपाशा बासु ही सध्या तिचे वैवाहिक जीवन जगत आहे. तिने सिनेविश्वातून ब्रेक घेतला आहे. मात्र अभिनेत्री बिपाषा बासु (Bipasha Basu) ही नेहमी तिच्याजवळ हातोडा ठेवते. सर्वांना हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला तरी हे खरे आहे.

अभिनेत्री बिपाशा बासु हीने बॉलीवुडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 2001 साली प्रदर्शित झालेल्या अजनबी (Ajnabee ) चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. (Bipasha Basu Bollywood Debut) पण त्या आधी बिपाशा मॉडेल म्हणून काम करत होती. यावेळी ती पीजी वर राहत होती. तिच्या या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तिच्या सोबत अशी घटना घडली होती ज्यामुळे बिपाशा तिच्यासोबत हातोडा ठेवू लागली. या घटनेशी दहशद अनेक वर्षे तिच्या मनामध्ये होती.

अभिनेत्री बिपाशा बासूने एका मुलाखती दरम्यान तिच्या सोबत घडलेला हा प्रसंग सांगितला होता. बिपाशा मॉडेलिंग करत असताना एका फॅशन शोवरुन रात्री उशिरा पीजीवर परतत होती. त्यावेळी तिचा काही गुंडांनी पाठलाग केला. खूप वेळ ते गुंड बिपाशाचा पाठलाग करत होते. ही बाब कार ड्रायव्हरच्या लक्षात आले. त्याने बिपाशाच्या पीजीच्या मालकांना फोन केला. हजरजबाबीपणा दाखवत ड्रायव्हरने बिपाशाच्या पीजीच्या मालकांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर पीजीच्या मालकांच्या व ड्रायव्हरच्या मदतीने बिपाशा सुखरुप पोहचली. पण त्यानंतर बिपाशा तिच्यासोबत सुरक्षिततेसाठी हातोडा जवळ ठेवू लागली.

आता अभिनेत्री बिपाशा बासु (Bipasha Basu) अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) सोबत वैवाहिक आयुष्य
सुखाने जगत आहे. त्यांना आता देवी नावाची मुलगी देखील आहे. आता जरी बिपाशा सिनेविश्वापासून लांब असली तरी बिपाशाने
बॉलीवुडमध्ये (Bipasha Basu Hot Photo) आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. (Bipasha Basu Movies) बिपाशाने धूम, नो एन्ट्री,
जिस्म, राज, रेस यांसारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारली आहे. तिच्या अदांवर व अभिनयांवर आजही अनेक चाहते भाळलेले आहेत.

Web Title : Bipasha Basu | when bipasha basu driver saved her life from goons during her modeling days know actress story

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Protest Against BJP Govt | काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन ! ‘भाजप’ वॉशिंग मशीन, ‘मोदी’ वाशिंग पावडर

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले…

Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

Uddhav Thackeray | ‘मर्दाची औलाद असाल तर या सरकारी यंत्रणा…’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान (व्हिडिओ)