Pune Crime News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 11 लाखाचा गांजा व आफिम जप्त, महिलेसह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-1 ने Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल 11 लाख 22 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर पोलिस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतून लक्ष्मण गवनेर काळे Laxman Gavner Kale (55, रा. मु.पो. पारधी वस्ती, हिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला अटक केली असून त्याच्याकडून 2 लाख 56 हजार 400 रूपये किंमतीचा 12 किलो 820 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. परिसरातून एका बीड जिल्हयातील (Beed District) आष्टी तालुक्यातील खडकत येथील 45 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक करून तिच्या ताब्यातील 2 लाख 66 हजार 600 रूपयाचा 13 किलो 330 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्यांच्याविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या (Marketyard Police Station) हद्दीतून तुलछाराम गीगाराम चौधरी Tulcharam Gigaram Chowdhary (39, सध्या रा. तुळजाभवानी नगर, आई माता मंदिराजवळ, सर्व्हे नंबर 658/4, बिबवेवाडी, पुणे. मुळ रा. मुख्याग्राम मोडी, सतलान जोधपुर, राजस्थान) याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 5 लाख 85 हजार रूपये किंमतीचा 250 ग्रॅम आफिम जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad), सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dengle), शैलजा जानकर, पोलिस अंमलदार विशाल दळवी, पांडुरंग पवार, सचिन माळवे, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे, प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, राहुल जोशी, मारूती पारधी, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख आणि योगेश मोहिते यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Anti-Narcotics Cell of Pune Crime Branch seizes ganja and opium worth
11 lakhs, arrests three including a woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा