ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना तलाठी व खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदी केलेल्या जमीनीचा दस्ताची फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) हातकणंगले तालुक्यातील साजणी आणि तिळवणी येथील तलाठी व खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB Trap News) पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. कोल्हापूर एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.12) केली.

 

तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे Talathi Sarjerao Shamrao Ghosarwade (वय-41 रा.फ्लॅट नं.108, स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, पुईखडी, नवीन वाशी नाका जवळ, कोल्हापूर, मूळ रा. कांडगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), खाजगी व्यक्ती साहिल यासीन फरास Sahil Yasin Faras (वय- 23 रा. साजणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 33 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार दिली आहे.

 

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमीनीचा दस्त फेरफारमध्ये नोंद करणेसाठी तसेच तक्रारदाराच्या वडिलांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमीनीवर काढलेल्या बँकेच्या कर्जाचा तारण दस्त फेरफार मध्ये नोंद करणेसाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे याने 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम खासगी व्यक्ती साहिल फरास याच्याकडे देण्यास सांगितली.

याबाबत तक्रारदार यांनी कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता तलाठी घोसरवाडे याने 20 हजार रुपये लाचेची मागणी
करुन लाचेची रक्कम फरास याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रादार यांच्याकडून 20 हजार रुपये घेताना साहिल फरास याला ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळात तलाठी सर्जेराव घोसरवाडे याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (
Addl SP Sheetal Janve), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर (PSI Sanjeev Bambargekar), पोलीस अंमलदार विकास माने,
सुनील घोसाळकर, रुपेश माने, उदय पाटील, सूरज अपराध यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : ACB Trap News Talathi and a private person arrested by ACB while taking Rs 20 bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा