Pune Crime News | झोपण्याच्या जागेवरुन वाद, ज्येष्ठ नागरिकाचा धारदार हत्याराने वार करुन खून; खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये शुल्लक कारणावरून खूनाच्या घटना घडत आहेत. खडकीमध्ये झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागिरकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder In Pune) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Pune Police) खुनाचा गुन्हा दाखल करुन एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.4) रात्री साडे दहाच्या सुमारास उघडकीस आली. (Pune Crime News)

मंगेश भागाजी भद्रीके Mangesh Bhagaji Bhadrike (वय-75 रा. खडकी रेल्वे स्टेशन फुटपाथ, खडकी) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर विकास रामचंद्र गायकवाड Vikas Ramchandra Gaikwad (वय-52 रा. खडकी बाजार, खडकी) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक आण्णा बादशहा गुंजाळ (PSI Anna Badshah Gunjal) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे खडकी रेल्वे स्टेशन (Khadki Railway Station)
येथील फुटपाथवर राहतात. शनिवारी आरोपी आणि मयत यांच्यामध्ये फुटपाथवर झोपण्यावरून वाद झाला.
त्यानंतर विकास गायकवाड हा दारु पिऊन त्या ठिकाणी आला.
त्याने मंगेश भद्रीके यांच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर धारदार हत्याराने सपासप वार केले.
यामध्ये मंगेश भद्रीके हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील (PI Man Singh Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : शारीरिक संबंधाबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी, वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेवर FIR

Pune Crime News | 55 वर्षाच्या व्यक्तीकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, सिंहगड रोड परिसरातील घटना