Pune Crime News | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न, नगर जिल्ह्यातील ठेकेदारावर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाल (Maharashtra Jeevan Pradhikaran Department) एक कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी नगर जिल्ह्यातील एका ठेकेदारावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बनावट बँक गँरंटी सादर करुन फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात डिसेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयाचे उपविभागीय अभियंता श्रीकांत मधुकर राऊत (वय-53) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार बाबासाहेब जयवंत समत Contractor Babasaheb Jaywant Samat (वय-52 रा. बक्तापुर, ता. शेवगाव जि. अहमदनगर) याच्यावर आयपीसी 420, 465, 468, 471, 511 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबासाहेब समत हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार आहे. प्राधिकरणाने वडगाव रासाई, सादलगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठीच्या रेट्रो फिटिंगच्या कामाची 1 कोटी 3 लाख 36 हजार 38 रुपयांची निविदा काढली होती. ही निविदा समत याने भरली होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेमधून हे काम समत यांना मिळाले होते. (Pune Crime News)

प्राधिकरणाच्या नियमानुसार समत यांनी बँक गॅरंटी देणे बंधनकारक होते. आरोपीने त्यासाठी त्यांच्या बँक खात्यात
1 कोटी 14 लाख 68 हजार 168 रुपये असल्याचे खोटे व
बनावट बँक गॅरंटी पत्र (Fake Bank Guarantee Letter) तयार केले.
आरोपी समत यांनी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे पत्र प्राधिकरणाला सादर केले.
त्याद्वारे प्रधिकरणाकडून 1 कोटी 33 लाख 604 रुपये स्वत:च्या बँक खात्यामध्ये जमा करुन घेण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपी ठेकेदार बाबासाहेब समत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधाळे (API Madhale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणीकंद : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा