Pune Crime News | बिबवेवाडी पोलिसांकडून खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार (Abscond In Murder Case) असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) अटक केली आहे. त्याने दि. 24 मे 2023 रोजी श्रीकांत मच्छिंद्र जाधव (38, रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे) यांचा खून केला होता. (Pune Crime News)

 

संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे Sanket Alias Monya Santosh Vicare (27, रा. राजगड चाळ, राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 24 मे 2023 रोजी मयत श्रीकांत जाधव आणि त्यांचे मित्र हे राजगड चाळीच्या कॉर्नरला गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपी सुनिल पारेकरने श्रीकांत जाधव यांना शिवीगाळ करून हाताने मारले होते. ते पोलिस चौकीच्या दिशेने जात असताना सुनिल पारेकर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी श्रीकांत जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर व कपाळावर विटाने गंभीर जखमा केल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. (Pune Crime News)

 

तेव्हपासुन दाखल गुन्हयात हवा असलेला आणि नुकताच मोक्काच्या गुन्हयातून सुटलेला
रेकॉर्डवरील आरोपी संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे हा फरार होता. अखेर बिबवेवाडी पोलिस पोलिस
अंमलदार अभिषेक धुमाळ यांना मोन्या बाबत माहिती मिळाली (Pune Police). मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला अटक केली. आरोपी मोन्याविरूध्द मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, विनापरवाना पिस्टल बाळगणे सह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar),
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve),
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे (Sr PI Savita Dhamdhere), पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर (PI Anita Hivarkar), तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe), पोलिस उपनिरीक्षक संजय आदलिंग (PSI Sanjay Adling), पोलिस हवालदार संतोष जाधव, अभिषेक धुमाळ, शिवाजी येवले, प्रणव पाटील, सतिश मोरे, ज्योतिबा काळे, तानाजी सागर आणि अतुल महांगडे यांच्या पथकाने आरोपी मोन्या विकारेला अटक केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Bibwewadi police arrested the absconding accuse Sanket Alias Monya Santosh Vicare in Murder Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा