Pune Crime News | पुण्यात रेशनिंगवरील धान्याचा काळाबजार ! खडक पोलिसांकडून भवानी पेठेतील तिघांना अटक, 2700 किलो तांदळाचा टेम्पा निघाला होता दौंड तालुक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रेशनिंगवरील धान्याचा काळाबाजार (Black Marketing Of Grain On Rationing) करणार्‍या रॅकेटचा खडक पोलिसांनी (Khadak Police) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी भवानी पेठेतील (Bhavani Peth) तिघांना अटक करण्यात आली असून 2700 किलो तांदुळ आणि इतर ऐवज असा एकुण 3 लाख 40 हजार 50 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

जावेद लालु शेख (35, धंदा – भंगार खरेदी-विक्री, रा. अंजुमन मस्जीद मागे, काशेवाडी, भवानी पेठ), अब्बास अब्दुल सरकावस (34, धंदा – ड्रायव्हर, रा. घर नं. 65, अशोकनगर कॉलनी, काशेवाडी, भवानी पेठ) आणि इम्रान अब्दुल शेख (30, रा. गोल्डन ज्युबली, काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात खडक पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार महेश प्रकाश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. दि. 11 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी हे भवानी पेठेतील काशेवाडी येथील राजीव गांधी सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर रेशनिंग दुकानदारांकडुन माल घेवुन तो काळया बाजारात विकण्यासाठी निघाले होते. त्यांचा टेम्पो 2700 किलो तांदुळे घेवुन दौंड (Daund Taluka) तालुक्यातील केडगाव (Kedgaon) येथे विक्री करिता जात होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला. (Pune Crime News)

खडक पोलिस ठाण्याच्या (Khadak Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव
(Sr PI Sangeeta Yadhav), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत (PI Sampatrao Raut) आणि
सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक (API Nitinkumar Naik) यांनी घटनास्थळी भेट दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एच.एम. काळे (API H.M. Kale) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Black marketing of grain on rationing in Pune! 2700 kg of rice was seized by the Khadak police from Bhawani Pethe in Daund taluka.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया