Pune Crime News | पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकी देणार्‍यास हैदराबादहून घेतले ताब्यात

पुणे : Pune Crime News | पुण्यातील गुगलच्या कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण कार्यालयाची व परिसराची तपासणी केली. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने हा फोन करणार्‍याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे. पुण्यात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याच्या भावानेच हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News)

पुण्यातील मुंढवा परिसरात एका बहुमजली व्यावसायिक इमारतीमध्ये ११ व्या मजल्यावर गुगलचे कार्यालय आहे. हे कार्यालय गेल्याचवेळी सुरु करण्यात आले आहे. मुंबईतील गुगलच्या कार्यालयात रविवारी रात्री फोन आला. त्यात फोन करणार्‍याने पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्ब ठेवला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुगलने ही बाब तातडीने मुंबई पोलिसांना कळविली. मुंबई पोलिसांनी ही बाब पुणे पोलिसांना (Pune Police) कळविली. त्यानंतर तातडीने मुंढवा पोलीस व बॉम्बशोधक आणि नाशक पथक गुगलच्या कार्यालयात पोहचले. (Pune Crime News)

त्यांनी संपूर्ण कार्यालय, इमारत, परिसराची तपासणी केली. मात्र, काहीही आढळून आले नाही.
त्याचदरम्यान, मुंबई पोलिसांनी फोन करणार्‍याचा शोध घेतला असता तो हैदराबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले.
हैदराबाद पोलिसांच्या मदतीने हा व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
तो पुण्यात गुगल कार्यालयात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याचा भाऊ असून त्याने मद्यधुंद अवस्थेत फोन
केल्याची कबुल दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title :-  Pune Crime News | Bomb threat to blow up Google office in Pune; The person who made the threat was taken into custody from Hyderabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणारं…’, उद्धव ठाकरेंचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला

Beed Crime News | दुर्देवी ! विजेचा धक्का लागल्याने 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू