Pune Crime News | चंदननगर पोलिसांकडून ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणार्‍याला गुजरातमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) केल्यास चांगला परतावा मिळवुन देतो असे सांगुन विश्वास संपादिप केल्यानंतर मोठया प्रमाणावर फसवणूक (Cheating Case) करणार्‍या टोळीतील एकाला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) गुजरात राज्यातील मेहसाणा येथून अटक केली आहे. त्याचे 3 साथीदार अद्याप फरार आहेत. (Pune Crime News )

प्रवीणभाई चौहाण Pravinbhai Chauhan (22, रा. गोरिसाणा, ता. खेरालु, जि. मेहसाणा, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अटक आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी एकाची 22 लाख 81 हजार 661 रूपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. आरोपीने फिर्यादीस अज्ञात मोबाईलवरून संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळतो असे सांगितले होते. सुरूवातीला आरोपीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यांना प्रॉफिट देखील मिळवुन दिले. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यावर भरणा केलेले एकुण 22 लाख 81 हजार 661 रूपये स्वतःकडे घेतले. त्यानंतर फिर्यादीने त्याच्याशी संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. (Pune Crime News)

गुन्हयाच्या तपासादरम्यान चंदननगर पोलिसांनी आरोपीने ज्या मोबाईलवरून फिर्यादीशी संपर्क साधला होता त्याची कुंडली काढली. त्यावरून आरोपी हे गुजरातमधील वडनगर येथील असल्याचे समजले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अधिक तपास केला. आरोपी हा मेहसाणामध्ये असल्याचे समजल्यानंतर चंदनरगर पोलिसांनी तेथे जावून खेरूला पोलिस स्टेशनच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, परराज्यातील पोलिस देखील आरोपींचा शोध घेत होते. कारण आरोपीने अनेकांना अशाप्रकारे फसविले होते.

अखेर चंदननगर पोलिसांनी आरोपीला शोधुन काढून त्याला ताब्यात घेतले. ट्रांजिट रिमांडव्दारे त्याला पुण्यात आणण्यात आले. न्यायालयाने त्याला दि. 21 जून 2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याचे आणखी 3 साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma), पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil), वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Rajendra Landge), पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले (PSI Rameshwar Revale), पोलिस हवालदार भरत उकिरडे, पोलिस अंमलदार संतोष शिंदे आणि महिला पोलिस अंमलदार मेमाणे आणि डहाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :   Pune Crime News | Chandannagar Police arrests fraudster from Gujarat in the name of online share trading

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा