Pune Crime News | स्वस्त मर्सिडीज पडली महागात, डिस्काउंट देण्याच्या आमिषाने 11 लाखांचा गंडा; डेक्कन परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मर्सिडीज बेन्झ कंपनीचा (Mercedes Benz Company) मेंबर असल्याचे सांगून मर्सिडीज बेन्झ गाडी (Mercedes Benz Car) घेतल्यावर जास्त डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखवून बुकिंगसाठी 11 लाख रुपये घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2019 मध्ये डेक्कन येथील एका जिममध्ये घडला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत अभिजीत रोहिदास देशमुख (वय-36 रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार यश सुजय शहा Yash Sujay Shah (वय-29 रा. साकेत कन्डोनयम अपार्टमेंट, सदाशिव पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यश शहा याने फिर्यादी अभिजीत देशमुख यांचा विश्वास संपादन करुन तो
स्वत: मर्सिडीज बेन्झ कंपनीचा मेंबर असल्याचे सांगितले. मर्सिडीज बेन्झ गाडी घेतल्यास जास्त डिस्काउंट देण्याचे
आमिष आरोपीने फिर्यादी यांना दाखवले. गाडीच्या बुकींसाठी तसेच खरेदीसाठी देशमुख यांच्याकडून वेळोवेळी
10 लाख 95 हजार 599 रुपये घेतले. तसेच कंपनीच्या बनावट लेटरहेडवर (Fake Letterhead) कंपनीचा बनावट शिक्का मारुन फिर्यादी यांना दिले. आरोपी यश शहा याने फिर्यादी यांच्याकडून घेतलेले पैसे कंपनीत जमा न करता त्याचा अपहार केला. अभिजित देशमुख यांनी गाडीबाबत विचारणा केली असता यश शहा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभिजित देशमुख यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुरुवारी (दि.19) यश शहा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटीलला देशभर फिरवणारा चालक मुंबई पोलिसांच्या ताब्यात, आतापर्यंत १६ जणांना अटक

Pune Crime News | मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पतीवर गुन्हा, येरवडा परिसरातील घटना