Pune Crime News | ताडीवाला रोड परिसरात दहशत पसरवणाऱ्या ‘चुन्न्या भाई’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दांडिया खेळणाऱ्या तरुणाला मारहाण करुन लुटले होते पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | बहिणीसोबत दांडिया खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण करुन त्याच्या पँन्टच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेत दहशत पसरवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.24) रात्री दहाच्या सुमारास ताडीवाला रोडवरील (Tadiwala Road) भीमटोला तरुण मंडळाजवळ घडली होती. (Pune Crime News)

याबाबत गणेश संजय पोळ (वय-28 रा. चमन बेकरी मागे, ताडीवाला रोड, पुणे) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार चन्न्या उर्फ बाळु म्हेत्रे (वय-35) व सचिन कैलास धिमधिमे (वय-19) यांना अटक केली आहे. तर मयुर कांबळे, हर्षद कांबळे (सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्यावर आयपीसी 392, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चन्न्या म्हेत्रे व सचिन धिमधिमे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या बहिणीसोबत भीमटोला तरुण मंडळाच्या ठिकाणी दांडिया
खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी चन्न्या म्हेत्रे हा त्याच्या साथीदारांसह त्याठिकाणी आला.
त्याने गणेश पोळ याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी गेली. त्यावेळी गणेशने पैसे देण्यास नकार दिला. पैसे दिले नाहीत म्हणून चन्न्या याने फिर्य़ादीच्या कानशिलात लगावली. तर इतर साथीदारांनी फिर्यादी यांना पकडले. आरोपी चन्न्या याने फिर्यादी यांच्या पँन्टच्या खिशातील 1140 रुपये जबरदस्तीने काढून घेत मारहाण केली. तसेच ‘जर कोणी आमच्या नादी लागला तर त्याची ही हालत करणार, ताडीवाला मध्ये फक्त चन्न्या भाईचा राज चालेल’ असे म्हणत आरडाओरडा करुन परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण हतागळे व त्याच्या एका साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 72 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | अमोल मिटकरींचा रावण दहन प्रथेवर आक्षेप; हिवाळी अधिवेशनात करणार ‘ही’ मोठी मागणी