Pune Crime News | कंपनीचा रिसर्च डाटा व पेटंट डाटा चोरून सुरु केली कंपनी, महाळुंगे येथील प्रकार; फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सुरुवातीला भागिदारीत कंपनी सुरु केली. त्यानंतर कंपनीचा रिसर्च डाटा (Research Data) व इतर साहित्यची चोरी करुन त्या आधारावर दुसरी कंपनी सुरु करुन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Pune Police) महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते सोमवार (दि.23) दरम्यान महाळुंगे येथे घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी अधीर प्रभाकर पोतदार (वय-49 रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश अतुल मोरे Suresh Atul More (वय-32 रा. डहाणुकर कॉलनी, कोथरुड) व एका महिलेवर आयपीसी 379,403,406,418,420, आयटी अॅक्ट व कंपनी अधिनियम कलम 447 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांनी 2018 मध्ये नॅस मायकोटेक नावाची कंपनी (Nass Mycotech Company) सुरु करुन रजीस्टर केली. कंपनी बायोडिग्रीडेबल पॅकेजींग मटेरीयल तयार करणार होती. यासाठी फिर्यादी यांनी आर्थीक मदत केल्याने पार्टनरशिप देण्यात आली होती. त्यानुसार 33:33 याप्रमाणे शेअरची भागीदारी ठरली. त्यानंतर पेटंट तयार झाल्यानंतर आरोपी महिलेने संचालक पदाचा राजीनामा दिला. (Pune Crime News)

दरम्यान, फिर्यादी यांनी याचा पाठपुरावा केला असता त्यांच्या लक्षात आले की आरोपी महिलेने मंजुर झालेल्या पेटन्ट
प्रमाणे नवीन पेटन्ट तयार करुन त्याला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
त्याला फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आरोपींनी नॅस मायक्रोटेक या कंपनीचा
रिसर्च डाटा, गोपनीय माहिती पेटंट डाटा याचा वापर करुन कावक ग्रीनटेक नावाची दुसरी
कंपनी (Kawk Greentech Company) सुरु केली.

आरोपींनी तयार केलेल्या कंपनीचा कोणताही आर्थिक हिस्सा फिर्य़ादी यांना न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
तसेच कंपनीने खरेदी केलेले साहित्य, डेटा पेटंट याची परस्पर माहिती घेऊन दुसरी कंपनी सुरु करुन फिर्यादी यांची
फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Yuva Sangharsh Yatra | ‘युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल’, शरद पवारांचा सरकारला थेट इशारा

Senior Police Inspector Lost His Pistol | बंदोबस्तादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची शासकीय पिस्तूल गायब