Sharad Pawar On Yuva Sangharsh Yatra | ‘युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल’, शरद पवारांचा सरकारला थेट इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Yuva Sangharsh Yatra | रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संघर्ष यात्रेला आजपासून पुण्यातून सुरुवात झाली. शरद पवार आणि रोहित पवार यांचे युवकांकडून यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. टिळक स्मारक हॉलमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा संघर्ष यात्रेला संबोधित करताना शरद पवार यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. (Sharad Pawar On Yuva Sangharsh Yatra)

यावेळी युवा संघर्ष यात्रेचे आयोजक, आमदार रोहित पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Sharad Pawar On Yuva Sangharsh Yatra)

,,, तर सत्ता गमवावी लागेल

युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरुणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. कंत्राटी भरतीचा मुद्दा युवा संघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेल्या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे

राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे, अशी तरुणांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात संघर्ष यात्रेतून झाली आहे. या यात्रेच्या
माध्यमातून सत्ता परिवर्तन शक्य आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 1800 किलोमीटर अंतराचा
प्रवास संघर्ष यात्रेकडून होणार आहे. हा प्रवास सुमारे 45 दिवसांचा आहे. ही यात्रा तरुणांना आत्मविश्वास देणारी ठरेल. यात्रेचा प्रारंभही उत्तम झाला आहे. शासनाला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला हे या यात्रेचे यश आहे. त्यामुळे सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष करू नये. विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी आहे. या विधिमंडळाचे दर्शन व्हावे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी जळगाव ते लातूर अशी दिंडी आम्ही काढली. ही युवा संघर्ष यात्रा आम्ही काढलेल्या दिंडीपेक्षा मोठी आहे. त्यामुळे ती परिणामकारक ठरेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

युवा संघर्ष यात्रेचा प्रवास…

पुणे ते नागपूर असा हा आठशे किलोमीटरचा युवा संघर्ष यात्रेचा प्रवास असणार आहे. 45 दिवसांचा हा प्रवास असणार आहे.
पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात झाली असून पुढे काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार,
परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष
यात्रेचा समारोप होणार आहे. नागपूर येथे यात्रेचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)

Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल’

Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा