Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील दोन हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा, 6 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोरेगाव पार्क येथे अवैधपणे सुरु असलेल्या दोन हुक्का पार्लरवर (Hookah Parlour) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell) एक ने छापा टाकला. या कारवाईत 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 6 जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) राजा बहादुर मिल स्टेशन रोड येथील हॉटेल ड्रामा 9 (Hotel Drama 9) आणि कोरेगाव पार्क लेन नं.7 येथील हॉटेल मोका (Hotel Moka) या ठिकाणी करण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील अवैद्यधंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक एकची दोन पथके तयार करण्यात आली होती. एका पथकाने राजा बहादुर मिल स्टेशन रोड (Raja Bahadur Mill Station Road) येथील हॉटेल ड्रामा 9 येथे छापा टाकून 18 हजार 500 रुपये किमतीचे हुक्का पॉट (Hookah Pot), तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त केले. तर कोरेगाव पार्क लेन नं.7 येथील हॉटेल मोका या ठिकाणी छापा टाकून 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल मालक, हुक्का पिणारे अशा एकूण 6 जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार
(ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle),
शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, मारुती पारधी,
सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, राहुल जोशी,
सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Crime branch raids two hookah parlors in Koregaon Park, FIR against 6 people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांना अधिकार नाही,’ या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले…

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात