Pune Crime News | रात्री उशिरापर्यंत पबमध्ये ‘डांगडिंग’, कल्याणीनगरमधील हॉटेल एलरो आणि युनिकॉर्न हाऊसवर गुन्हे शाखेच्या ‘सासु’ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शहरात रात्री उशिरापर्यंत डांगडिंग सुरू असणार्‍या हायप्रोफाईल हॉटेलवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा (SS Cell Pune) विभागाने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) 3 लाख 90 हजार रूपये किंमतीचे साऊंड सिस्टीम आणि डीजे मिक्सर जप्त केले आहेत. (Pune Crime News)

शुक्रवारी रात्री दहा वाजल्यानंतर कल्याणीनगर येथील हॉटेल एलरो (Hotel Ellora) आणि युनिकॉर्न हाऊस पबमध्ये (Unicorn House, Kalyani Nagar, Pune) नागरिकांना त्रास होईल अशा पध्दतीने साऊंड सिस्टीम सुरू होती.
पोलिसांकडे याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक,
अप्पर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे,
पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने दोन्ही हॉटेलवर छापा टाकून
कारवाई केली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण)
अधिनियम 2000 नियमावलीचा भंग केल्यामुळे हॉटेलवर कारवाई करण्यात आली. (Pune Crime News)

Web Title :- Pune Crime News | ‘Dangding’ in pub till late night, pune police crime branch ss cell action on Hotel Ellora and Unicorn House in Kalyaninagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स संघांची विजयाची हॅट्रीक !!

Sanjay Raut | महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदासंघातील उमेदवारीबाबत अजित पवार यांनी केले मोठे भाष्य; म्हणाले…