Pune Crime News | पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 5 गुन्हेगार तडीपार

आजपर्यंत झोन -2 च्या हद्दीतून 35 सराईत गुन्हेगार हद्दपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 5 गुन्हेगारांवर (Criminals On Pune Police Records) हद्दपारीची कारवाई केली आहे (Tadipar Action). पोलिस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 5 जणांना पुणे शहर (Pune City), पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) आणि पुणे जिल्हयातून (Pune District) तडीपार करण्यात आले आहे. (Pune Crime News )

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीतील अनिल महादेव चांदणे (वय-40 रा. तळजाई वसाहत, पुणे), हर्षद राजेंद्र देशमुख (वय-25 रा. चव्हाणनगर, धनकवडी) तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीतील शुभम दिपक उर्फ नथ्थु भोरेकर (वय-26 रा. आंबेगाव बु.) दत्ता राहुल कदम (वय-22 रा. जैन मंदिराजवळ, आंबेगाव खु.), किरण परशुराम भंडारे (वय-20 रा. फिरंगाई माता मंदिरा जवळ, आंबेगाव खु.) यांचा समावेश आहे. ( Pune Crime News)

झोन-2 मधील पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder),
खंडणी (Extortion), दंगा (Riots), दुखापत, जबरी चोरी (Robbery), बेकायदेशीर हत्यार बाळगणे, घरफोडी (Burglary),
तडीपार आदेशाचा भंग करणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍यांवर कायद्याचा
वचक रहावा म्हणून संबंधित पोलिस स्टेशनने त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची चौकशी पुर्ण केल्यानंतर 5 गुन्हेगारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ दोन कडून आजपर्य़ंत एकूण 35 आरोपींना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम (Maharashtra Police Act) 55 व 56 प्रमाणे हद्दपार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केली आहे. आगामी काळात देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील
सक्रिय गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nushrratt Bharuccha | “मला पण वाईट वाटतं…”, ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये कास्ट न केल्याने नुसरत भरुचाने व्यक्त केल्या भावना