Pune Crime News | मद्यापान करुन चालवली गाडी, पोलिसांची नाकाबंदी पाहून गेले पळून; पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोंढवा पोलिसांच्या नियमित नाकाबंदी दरम्यानचा प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मित्रांसोबत मद्यापान (Alcohol Drinking ) करुन गाडी चालवत असताना पोलिसांची (Pune Police) नाकाबंदी पाहून पळून गेलेल्या वाहन चालकाला खंडणी विरोध पथक (Anti Extortion Squad) आणि कोंढवा पोलिसांनी शोध घेऊन ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी (दि.25) रात्री कोंढवा येथील ज्योती हॉटेल चौकात घडली असून पोलिसांनी गुरुवारी (दि.26) पहाटे चालकाला हडपसर भागातून ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत ज्योती चौकामध्ये नाकाबंदी करुन कोंढवा पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) संशयित वाहनांची तपासणी करुन कारवाई केली जात होती. त्यादरम्यान नाकाबंदीच्या ठिकाणापासून 25 ते 30 फुटावर एक पांढऱ्या रंगाची किया सोनेट गाडी (एमएच 12 यु.जे. 5970) थांबल्याचे पोलिसांना दिसले. या गाडीच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या तसेच गाडीत तीन ते चार जण बसल्याचे पोलिसांना दिसले. पोलीस गाडी चेक करण्यासाठी जात असताना कार चालकाने गाडी जोरात रिर्व्हस घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हातातील काठ्या गाडीवर मारुन चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडी भरधाव वेगात मागे घेऊन निघून गेला.

पोलिसांना संशय आल्याने पोलीस स्टाफ व वॉर्डन यांनी गाडीचा खडीमशीन चौक, मंतरवाडी फाटा, फुरसुंगी पर्यंत पाठलाग केला. मात्र गाडी सापडली नाही. पोलिसांनी गाडीचा नंबर मिळवून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक व कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे गाडीचा शोध घेतला. पोलिसांनी हडपसर परिसरात कारचा शोध घेऊन कार चालक सुशिल सुधाकर चव्हाण (वय-23 रा. गुरुदत्त मंदिरासमोर, हडपसर) याला गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. (Pune Crime News)

पोलिसांनी संयुक्तपणे कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, हडपसर भागात दारु पिऊन गाडीतून
ज्योती हॉटेल चौकातून पुणे शहरात फिरण्यासाठी जात होतो.
मात्र, चौकात पोलीस नाकाबंदीमध्ये गाड्या चेक करत असल्याने पोलिसांना घाबरून व गाडीतील इतर दारु पिले
असल्याने पोलीस कारवाई करील या भीतीने पळून गेल्याचे सांगितले.

गाडीत बसलेल्या व्यक्तीपैकी एक जण तलाठी परिक्षा पास झाला होता.
त्या आनंदात पार्टी केल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.
तसेच गाडीतील इतर शिक्षण घेतात तर काही जण व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले.
संबंधित व्यक्तींचे पूर्वीचे कोणतेही पोलीस रेकॉर्ड नसल्याची तसेच गाडी चोरीची नसल्याची पोलिसांची खात्री झाली.
संबंधित व्यक्तींवर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण हतागळे व त्याच्या एका साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 72 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | अमोल मिटकरींचा रावण दहन प्रथेवर आक्षेप; हिवाळी अधिवेशनात करणार ‘ही’ मोठी मागणी