Pune Crime News | आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, बनावट आर्मी ऑफिसरला अटक

लष्करी गुप्तचर पथक आणि वानवडी पोलिसांची संयुक्त कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक (Cheating Case) करणाऱ्या एका बनावट आर्मी ऑफिसरला (Fake Army Officer) अटक केली आहे. लष्करी गुप्तचर पथक (Military Intelligence Squad) आणि वानवडी पोलिसांनी (Pune Police) संयुक्त कारवाई करुन मंगळवारी (दि.26) मध्यरात्री अटक केली आहे. आरोपीने अनेक तरुणांना आर्मीमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करुन आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तोतया आर्मी ऑफिसरने 15 जणांची 12 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचे उघडकीस आले आहे. (Pune Crime News)

याबाबत धोंडीबा राघू मोटे (वय 21 रा. मुपो मोटेवडी ता. जत, जिल्हा सांगली) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रणजीत कुमार राजेंद्र सिंग Ranjit Kumar Rajendra Singh (रा कोईमत्तूर राज्य तामिळनाडू) याच्यावर आयपीसी 406, 420, 467, 468, 471, 470, 171 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते सप्टेंबर 2023 दरम्यान रेस कोर्स वानवडी (Race Course Wanwadi) येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र सचिन कोळेकर, माळाप्पा पांढरे, व सागर मोटे (रा कंटी ता.जत जि.सांगली) हे वानवडी येथील रेस कोर्स येथे आर्मी भरतीचा सराव करत होते. त्यावेळी आरोपी रणजीत कुमार सिंग हा त्याठिकाणी आला. त्याने आर्मी इंटेलिजन्समध्ये रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करत असल्याचे फिर्यादी व त्यांच्या मित्रांना सांगून आर्मीचे बनावट ओळखपत्र (आयकार्ड) दाखवले. तसेच त्यांना सिकंदराबाद येथे भरती करतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना आर्मी मध्ये नोकरी लागली असल्याचे सांगून बनावट अपॉईंटमेंट लेटर (Fake Appointment Letter) दिले. त्याने फिर्यादी यांच्यासह इतर तिघांकडून वेळोवेळी 12 लाख 80 हजार रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरुपात घेतले. दरम्यान, आरोपीने दिलेले अपॉईंटमेंट लटर बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी 26 सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. (Pune Crime News)

आरोपीने परमेश्वर महादेव घोडके (रा. जेवळी ता.लोहार, जि. उस्मानाबाद), दत्ता चंद्रकांत म्हेत्रे
(रा. देवणी,ता देवणी, जि. लातुर), अभिजीत सूर्यकांत तांबे (रा. मयूर पार्क हांडेवाडी, पुणे), सचिन वसंत पवार,
आदित्य संजय पवार, प्रतीक प्रवीण पवार ((रा. रहमतपुर ता. कोरेगाव जि. सातारा), सुरज सुनील मोरे
(रा. मोरेवाडी, ता. जावळी. जि. सातारा), चेतन हनुमंता चव्हाण (रा. आरळे. ता. सातारा. जि. सातारा), अभय श्रीरंग नलावडे (रा. पानपेळवाडी ता. जि. सातारा), गणेश क्षीरसार (रा. तुळजापूर जि. उस्मानाबाद), निलेश दयाप्पा नाईक (रा. धाटी ता. चंदगड जि. कोल्हापूर), प्रमोद दशरथ गावडे (रा. हल्लारवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर), तौसीफ शेख (ता तुळजापूर जि. उस्मानाबाद) यांना देखील आर्मीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

आरोपी रणजीत कुमार राजेंद्र सिंग याला मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अटक केली.
ही कारवाई लष्करी गुप्तचर पथक आणि वानवडी पोलिसांनी संयुक्त पणे केली.
पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे (PSI Ajay Shitole) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या
ऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे;
प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी.
पर्यायी रस्ता तयार होणार !