Pune Crime News | पोलीस भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, 10 तोतया उमेदवारांवर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती (Pune Rural Police Force Recruitment) होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र (Fake Certificate) सादर करुन पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या दहा तोतया उमेदवांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिल्याचे भासवून फसवणूक केली आहे. ( Pune Crime News)

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक युवराज मारुती मोहिते DSP Yuvraj Maruti Mohite (वय-57) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी उमेदवार सोमीनाथ सुधाकर कंटाळे Sominath Sudhakar bored (रा. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड), अजय बभ्रुवान जरक Ajay Babruwan Jarak (रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर), अक्षय बाळासाहेब बडवे Akshay Balasaheb Badwe (रा. सोमनाथनगर, कोंढवा बुद्रुक), दिनेश अर्जुन कांबळे Dinesh Arjun Kamble (रा. ब्रह्मगाव, जि. बीड), राजेश रमेश धुळे (रा. नांदेड), अमोल विठ्ठल गरके Amol Vitthal Garke (रा. ता. भोकर, जि. नांदेड), धृपद प्रल्हाद खारोडे Dhrupad Prahlad Kharode (रा. वाकड, ता. भोकर, जि. नांदेड), गोविंद भक्तराज मिटके Govind Bhaktaraj Mitke (रा. शिवणगाव, ता. उमरी, जि. नांदेड), आसाराम बाळासाहेब चौरे Asaram Balasaheb Choure (रा. ता. केज. जि. बीड), हेमंत विठ्ठल निकम Hemant Vitthal Nikam (रा. वाघोली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध आयपीसी 419,420,465,468,471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदाची भरती प्रक्रिया 2021 मध्ये राबवण्यात आली होती. भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भरतीसाठी सादर केलेल्या शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांची पडताळणीसाठी बोलावले होते. भरती प्रक्रियेत आरक्षणनिहाय कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेकडे सोपवली होती. ( Pune Crime News)

सोमीनाथ कांटाळेसह 10 उमेदवारांनी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात बीड येथील
प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.
या प्रमाणपत्राची जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेकडून पडताळणी करण्यात आली.
त्यावेळी उमेदवारांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले.
फसवणूक केल्याप्रकरणी 10 उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करुन त्यामध्ये खाडाखोड करुन ते पोलीस भरतीसाठी सादर केले.
आरोपींनी 2009 ते 2015 दरम्यान आधीच प्रमाणपत्र काढून ठेवले होते.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव (API Sambhaji Gurav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘टास्क फ्रॉड’ मधून 9 लाखांचा ऑनलाइन गंडा, बिबवेवाडी परिसरातील प्रकार