Pune Crime News | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, तळेगाव दाभाडे परिसरातील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुख्यमंत्री कार्य़ालयातून बोलत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून (Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana) एक कोटी रुपये कर्ज मंजूर करुन देण्याचे आणि मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची चार लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे 2023 ते आज पर्य़ंत तळेगाव दाभाडे परिसरात घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश चव्हाण (रा. चिंचवड) आणि एका महिलेवर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आयुर्वेदिक उत्पादने (Ayurvedic Products) विक्रीची कामे करतात.
महिला आरोपीने मंत्रालयात नोकरीला तर राजेश चव्हाण याने स्टेट बँकेत नोकरी करत असल्याचे सांगितले. फिर्यादी, त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्य़क्रम योजनेतून एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले. तसेच मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 4 लाख 3 हजार 240 रुपये घेतले. (Pune Crime News)

पैसे दिल्यानंतर फिर्यादी यांनी कर्जाबाबत आणि मुलीला नोकरी लावण्याबाबत आरोपींकडे विचारणा केली.
त्यावेळी आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोबाईल बंद केला.
फिर्यादी यांनी आरोपींबाबत चौकशी केली असता आरोपी महिला मंत्रालयात काम करत नसल्याचे समजले.
तसेच रजेश चव्हाण हा स्टेट बँकेच्या काळेवाडी शाखेत काम करत नसल्याचे समजले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दुर्गनाथ साळी (API Durgnath Sali) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thackeray Group On CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे हे स्वतः हमास, उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यातील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची टीका भाजपा नेत्यांच्या जिव्हारी, शेलार म्हणाले – ‘आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे…’