Pune Crime News | ब्रॅण्डेड कपड्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून एकावर गुन्हा, लाखोंचे कपडे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये नामांकित ब्रॅण्डच्या (Branded Clothes) नावाने बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्यांवर कॉपीराईटच्या कायद्यांतर्गत (Copyright Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई (Pune Crime News) हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत पुणे पोलिसांच्या (Pune Police Crime Branch) गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Crime Branch Unit-5) पथकाने करुन एकला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये नामांकित कंपन्यांचे बनावट टी शर्ट, पँट इत्यादी कपड्यांचा समावेश आहे.

सचिन गंगाधर नरवडे (रा. मातोश्री हाईट्स, शिंगोटे पार्क गोपाळपट्टी, महादेवनगर, हडपसर) याच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे. ब्रँड प्रॉडक्टस इंडिया प्रा. लि. (Brand Products India Pvt. Ltd.) कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सोहनसिंग देवरा (वय-36 रा. पेरवा पाली, राजस्थान) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) महादेवनगर येथील मॅक्स मॅन्युफॅक्चरर व होलसेलर (Max Manufacturer and Wholesale) या ठिकाण करण्यात आली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेवनगर येथील एका दुकानात लुइस फिलिप (Louis Philipp),
एलेन सोली (Ellen Solly), पीटर इंग्लंड (Peter England) या नामांकित ब्रॅण्डच्या कंपन्यांचे स्टॅग/डीएर
व क्राऊन लोगो लावून बनावट कपड्यांची विक्री होत होती. याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या अधिकाऱ्यांना
माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने महादेवनगर येथील मॅक्स मॅन्युफॅक्चरर व होलसेलर येथे छापा टाकला.
पथकाने सचिन गंगाधर नरवडे यांना ताब्यात घेऊन 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम
(Police Inspector Ulhas Kadam), सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार दयाराम शेगर,
रमेश साबळे, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेक, महिला पोलीस नाईनक स्वाती गावडे यांच्या पथकाने
केली.

Web Title :- Pune Crime News | Fraud of customers in the name of branded clothes, crime branch booked one, seized clothes worth lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘विधीमंडळाचाच नाही तर जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही’ – नाना पटोले

Pune Kasba Peth Bypoll Election Results | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

MP Sanjay Raut | संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, 8 मार्चला निर्णय; राहुल नार्वेकरांची माहिती