Pune Crime News | गॅस एजन्सीचे मालक व कामगारांना धमकावून खंडणीची मागणी, उत्तमनगर पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गॅस एजन्सी चालक व कामगार यांना धमकावून दरमहा 15 हजार रुपये खंडणी मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्या दोघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी शिवणे, कोंढवे धावडे, कोपरे या भागातील वेगवेगळ्या गॅस एजन्सीच्या डिलेव्हरी बॉय यांना आडवून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून खंडणीची मागणी केली होती. तसेच आरोपींनी गॅस एजन्सीचे मालक व कामगरांना गाडी अडवून, भेटून व फोन वरुन शिवीगाळ करुन दमदाटी करत खंडणीची मागणी केली. (Pune Crime News)

अमोल परशुराम रायकर Amol Parasuram Raikar (वय-30 रा. कोंढवे धावडे, पुणे), सोमनाथ उद्धव कोमिले Somnath Uddhav Komile (वय-28 रा. रामनगर, वारजे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खडकवासला येथील पृथ्वी एच.पी. गॅस एजन्सीमध्ये काम करणारे कामगार चंदनसिंग भवरसिंग भाटी (रा.डोणजे गाव, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

अमोल रायकर याने भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचा अध्यक्ष असे लेटर हेड व ओळख पत्र वापरून खडकवासला, शिवणे, वारजे, कोथरुड या भागातील एच पी कंपनीचा गॅस एजन्सींना टार्गेट केले. तुम्ही परप्रांतीय कामगारांना कामावर ठवेले आहे. त्यांना कामावरुन काढून टाका, लोकांकडून जास्तीचे पैसे घेता, ब्लॅकने गॅस सिलिंडर टाकी विकता, तुम्हाला धंदा करायचा असेल तर मला दरमहा 15 हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा मी तुमच्या विरोधात पोलिसांकडे व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देऊन आंदोलन करेन अशी धमकी फिर्यादी यांना दिली.

आरोपीने फिर्यादी यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने पाच हजार रुपये खंडणी वसूल केली. तसेच त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गाडीतील 3300 रुपये किंमतीची गॅस टाकी चोरली. आरोपींनी वेगवेगळ्या गॅस एजन्सीवर जाऊन बेकायदेशीर तपासणी करण्यास सुरुवात केली. तसेच गॅस एजन्सी मालकांना फोन करुन शिवीगाळ व दमदाटी करण्यास करु लागले. एवढेच नाहीतर त्यांनी शिवणे, कोपरे, कोंढवे धावडे या भागात गॅस सिलिंडर टाकीची डिलीव्हरी करणाऱ्या गाड्या व कामगारांना अडवून त्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. आरोपींच्या त्रासाला कंटाळून सर्व एजन्सी चालकांनी एकत्र येऊन सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे यांची भेट घेतली होती.

दरम्यान, गॅस एजन्सी चालकांना वारंवार फोन करुन शिवीगाळ व दमदाटी करुन खंडणी मागत असल्याच्या
पुराव्यांची पडताळणी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सोहेल शर्मा यांनी दिले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमोल रायकर व सोमनाथ कोमिले यांनी अंबिका गॅस एजन्सीच्या मालकांकडे पैशांची
मागणी करत असल्याचे पुरावे आढळून आले. त्यानंतर गुरुवारी (दि.5) पाच हजार रुपये खंडणी स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सोहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे,
पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तोडकर, अनिरुद्ध गायकवाड, तुषार किंद्रे यांनी केली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Caste Wise Census | बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश