Pune Crime News | विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडीचे (House Burglary ) सत्र सुरुच आहे. शहरातील विश्रांतवाडी (Vishrantwadi), वानवडी (Wanwadi) आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत झालेल्या घरफोडीमध्ये सोन्याचे दागिन्यांसह बलेनो व स्विफ्ट कार असा एकूण 13 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

होळीच्या सणासाठी गावी गेले असताना चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील लॉकर तोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण एक लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार धानोरी परिसरातील भैरवनगर (Bhairav Nagar Dhanori) येथे 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत घडला. याबाबत मिलींद गंगाराम शिंदे (वय-52 रा. राधीका निवास, भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे.

फिर्य़ादी व त्यांचा भाऊ होळी सणासाठी 29 मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास गावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. फिर्य़ादी व त्यांच्या भावाच्या खोलीतील कपाटामधील लॉकर तोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. फिर्यादी सोमवारी दुपारी चार वाजता घऱी आले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करुन चोरट्याचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड (PSI Nitin Rathod) करीत आहेत.(Pune Crime News)

चोरीची दुसरी घटना वानवडी परिसरात घडली आहे. याबाबत अलीन रज्जाक पटेल (वय-40 रा. काळेपडळ, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी घराला कुलुप लावून बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. किचनमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ड्रायव्हर मध्ये ठेवलेले आठ ग्रॅम वजनाचे 35 हजार रुपयांचे गंठन चोरुन नेले. हा प्रकार सोमवारी सकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेत घडला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दोन कारची चोरी

चोरीची तिसरी घटना सोलापूर रोडवरील शंकर मठाजवळ असलेल्या चिंतामणी मोटर्स येथे घडली. चोरट्यांनी दहा लाख 50 हजार रुपये किमतीच्या बलेनो व स्विफ्ट कार चोरुन नेल्या. हा प्रकार रविवारी रात्री सात ते सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडला आहे. याबाबत रिजावान अमीरुद्दीन शेख (वय-43 रा. नानापेठ, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

फिर्य़ादी यांचे चिंतामणी मोटर्स नावाचे सोलापूर रोडवर दुकान आहे. त्यांनी रविवारी रात्री सात वाजता दुकान बंद केले. चोरट्यांनी दुकानाचे कुलुप तोडून दुकानात प्रवेश केला. कपाटातील गाड्यांच्या चाव्या काढून पाच लाख 50 हजार रुपयांची लाल रंगाची बलेनो कार व पांढऱ्या रंगाची पाच लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार चोरुन नेली. सोमवारी सकाळी दहा वाजता फिर्य़ादी दुकानात आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ हडपसर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त