Pune Crime News | हिंजवडीत गांजाचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad City) 9 लाख 33 हजार रुपयांचा 31 किलो गांजा (Ganja Seized) पकडण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी (Pimpri Police) ही कारवाई सोमवारी (दि.30) सकाळी बाराच्या सुमारास वाकड ब्रिज कडून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या अंतर्गत रोडवर केली. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक करुन 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

मैनुद्दीन अब्दुल सत्तार Mainuddin Abdul Sattar (वय-23 मुळ रा. गील्हाबारी, ठाकुरगंज, जि. आपोखर किशनगंज, बिहार, सध्या रा. फेज-2 हिंजवडी), बिपलभ बिदण राणा Bipalabh Bidan Rana (वय-23 रा. एमक्युर कंपनी जवळ, फेज-2 हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर एन.डी.पी.एस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यातील अवैध धंदे विरोधी पथकाचे (Anti-Illegal Business Squad) पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार रवी पवार यांना माहिती समजली की, वाकडकर वस्ती येथे एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या टेम्पो (एमएच 14 एच.यु 2553) मधून गांजा घेऊन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने वाकड ब्रिज कडून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या अंतर्गत रोडवर सापळा रचला. (Pune Crime News)

पथकाने पांढऱ्या रंगाचा पिक अप थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने गाडीत भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची झडती घेतली. झडतीमध्ये नायलॉनच्या दोन पिशव्यामध्ये ब्राऊन रंगाच्या चिकट पट्टीने गुंडाळलेले 17 पुढे आढळून आले. पोलिसांनी ते पुडे फोडून पाहिले असता त्यामध्ये गांजा सापडला. पोलिसांनी या कारवाईत 9 लाख 33 हजार रुपये किंमतीचा 31 किलो 100 ग्रॅम गांजा, टेम्पो असा एकूण 14 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(IPS Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole), सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग
विशाल हिरे (ACP Vishal Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ
(Sr PI Sriram Pol), पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख, अवैध धंदे
विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश वायबसे,
पोलीस अंमलदार संतोष डामसे, रवी पवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मांजरी गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात 4 जणांवर FIR, गोडाऊन मालकाला अटक

Praneti Lavange Khardekar | प्रणेती लवंगे खर्डेकर यांची नागपूर जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती