Pune Crime News | मांजरी गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात 4 जणांवर FIR, गोडाऊन मालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका गॅस टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरत असताना स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीत घडली होती. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करुन गोडाऊन मालकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मांजरी येथील बेल्हेकर वस्ती येथे रविवारी (दि.29) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला होता. (Pune Crime News)

सुमित सुनिल घुले Sumit Sunil Ghule (वय-40 रा. वृंदावन सोसायटी, बेल्हेकर वस्ती, मांजरी) असे अटक केलेल्या गोडाऊन मालकाचे नाव आहे. तर गोडाऊनमध्ये काम करणारे कामगार रमेश कुरुमकर (रा. मांजरी बु), प्रेमाराम शेर (रा. हांडेवाडी, पुणे), साईराम सातव (वय-36 रा. वाघोली) यांच्यावर आयपीसी 420, 285, 286, 338, 337, 34 सह जीवनावश्यक वस्तु अधिनियम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रदिप प्रकाश क्षिरसागर (वय-37) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईराम सातव याने साईभारत एजन्सी (Saibharat Agency) येथून
आणलेले गॅस सिलेंडर सुमित घुले याला दिले. आरोपी गोडाऊन (Gas Cylinder Godown) मालक सुमित घुले
याने गोडावूनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त घरगुती गॅस सिलेंडरची (Domestic Gas Cylinder) साठवणुक केली.
रविवारी सायंकाळी घुले व कामगार रमेश आणि प्रेमाराम हे गॅस गोडावुन मध्ये बेकायदेशीर एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होते. त्यावेळी गॅस लिक होऊन स्फोट झाला. यामध्ये रमेश कुरुमकर व प्रेमाराम शेर हे जखमी झाले. (Pune Crime News)

पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी गोडाऊन मालक सुमित घुले याच्याकडे गॅस सिलेंडर देण्याचा कोणतीही
अधिकृत परवाना नव्हता. परवाना नसताना घुले नागरिकांना अनिधिकृतपणे गॅस सिलेंडर पुरवत होता.
तसेच नियमित पणे पुरवण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमधून गॅस कमी पुरवून लोकांची फसवणूक (Cheating Fraud Case)
करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे (API Dabhade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | दिवाळीची खरेदी केलेली बॅग विसरली, फरासखाना पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन परत केली

Pune Crime News | भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन पुणे मनपाची फसवणूक, दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या कुख्यात नाना गायकवाडवर पालिकेकडून FIR