Pune Crime News | चारचाकी गाड्यांचे शो-रुम फोडणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड; महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील 21 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील चारचाकी गाड्यांचे शोरूम (Four Wheeler Showroom) मध्ये दरोडा (Robbery) टाकणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट पाचच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने तब्बल 21 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना (Pune Crime News) बांद्रा रेल्वे स्थानकावरुन (Bandra Railway Station) अटक करण्यात आली आहे.

पुणे शहरातील बिबवेवाडी येथील देवकी मोटर्स (Devaki Motors) एल.एल. पी. टाटा मोटर्स (L.L. P. Tata Motors) मधील पॅन्टी रुमचे स्लाइडिंग विंडोची मागील लोखंडी जळी तोडून चोरट्यांनी शोरुमच्या तिजोरीतून 4 लाख 96 हजार 493 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने करुन 6 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. (Pune Crime News)

सावन दवल मोहिते (वय-19 रा. मुपो. दहिखेड, ता. जि. अकोट सध्या रा. मुपो. विचवे, ता. बोधवड, जि. जळगाव), बादल हिरालाल जाधव (वय-19 रा. मुक्ताईनगर, जळगाव), सोनु नागुलाल मोहिते (वय-22 रा. मुपो. विचवा, ता. बोधवड, जि. जळगाव), अभिषेक देवराम मोहिते (वय-20 रा. धानोरा, ता. बोधवड), जितु मंगलसिंग बेलदार (वय-23 रा. धानोरा, ता. बोधवड), पिंटु देवराम चौहान (वय-19 रा. मोरुद मरीमाता, ठाणे केजाजी नगर, खांडवा रोड, व्हीक्टोरिया कॉलेज जवळ, इंदोर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा शोध घेत असताना युनिट पाचच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 19 किमी अतंरावरील वाहनांचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला. त्यावेळी एका संशयित गाडीवरुन त्या गाडी मालकाचे नाव व पत्ता शोधला असता ही गाडी जळगाव येथील असल्याचे समोर आले. त्याआधारे पथकाने जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारे गाड्यांचे शो-रूम फोडुन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेतली असता 2019 मध्ये अशा प्रकारच्या सहा घटना घडल्याची माहिती पथकाला मिळाली.

युनिट पाचच्या पथकाने जळगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेतली असता चोरटे उत्तर भारतात फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींचे फोटो व नंबर मिळवून त्यांचा नवी दिल्ली, मथुरा, हरिद्वार शहरात पाठलाग केला. आरोपी पुन्हा मुंबईच्या दिशेने गेल्याचे समजताच युनिट पाचच्या पथकाने बांद्रा रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी वीस दिवसांपूर्वी बिबवेवाडी येथील टाटा मोटर्सच्या शो-रुममध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची पोलीस कस्टडी घेऊन केलेल्या चौकशीत त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या
(Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीमध्ये 21 जुलै रोजी टोयोटा शोरूम (Toyota Showroom) व
हुंडई शोरूम (Hyundai Showroom) येथे चोरी केल्याचे सांगिते. तसेच मुंबई बेंगलोर हायवेने
(Mumbai Bangalore Highway) कर्नाटक मार्गे गोव्याला जात असताना शिमोगा जिल्ह्यातील
कोटे पोलीस ठाण्याच्या (Kote Police Station) हद्दीतील तीन शोरुममध्ये चोरी केली.
त्यानंतर गोव्यामध्ये चोरीच्या पैशांची मोजणी केली. परत येताना गोवा येथील वेरना पोलीस ठाण्याच्या (Verna Police Station) हद्दीतील दोन शोरुममध्ये चोरी केल्याचे आरोपींनी सांगितले.

तपासात आरोपींनी महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), गोवा (Goa) या राज्यांमधील तब्बल 21
शोरुममध्ये चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून 6 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या टोळीने पुण्यासह महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापुर, अमरावती, ठाणे, नवी मुंबई तसेच कर्नाटकातील शिमोगा, विजापुर,
रायचुर, बल्लारी आणि गोवा राज्यातील वेरणा येथील शो-रुम फोडून घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे
(PSI Avinash Lohote), पोलीस अंमलदार चेतन चव्हाण, राजस शेख, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड,
प्रमोद टिळेकर, राहुल ढमढेरे, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, विलास खंदारे, आश्रुबा मोराळे, शहाजी काळे, विनोद शिवले,
शेख, अमित कांबळे, शशिकांत नाळे, संजयकुमार दळवी, राहुल होळकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ST च्या आगार प्रमुखासह वाहक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात