Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकास धमकावुन लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Crime News | संक्रातीच्या खरेदीसाठी मंडई येथुन बाजीराव रोडच्या दिशेने पायी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकास धमकावुन त्यांच्याकडून रोख रक्कम जबरदस्तीने लुटणार्‍यास खडक पोलिसांनी (Khadak Police Station) अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. (Pune Crime News)

समीर उर्फ मेहबुब छोटुमियाँ शेख (43, रा 101, भवानीपेठ, अंगारशा टकिया, भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे दि. 13 जानेवारी रोजी संक्रातीच्या खरेदीकरिता मंडई परिसरात आले होते. तेथून ते बाजीराव रोडच्या दिशेने पायी जात असताना शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीजवळ आरोपीने त्यांना धमकावले. त्यांच्या पायाजामामधील 2 हजार 500 रूपये जबरदस्तीने लुटले. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपासाबाबत तपास पथकास सुचना दिल्या. त्यानंतर चोरटयाचा माग काढून खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली. (Pune Crime News)

पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill), सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संगीता यादव (Sr PI Sangita Yadhav),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे (PI Rajesh Tatkare), सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव
(API Rakesh Jadhav), उपनिरीक्षक अतुल बनकर (PSI Atul Bankar), पोलिस अंमलदार अजीज बेग,
संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार वाबळे,
नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव आणि योगेश चंदेल यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

Web Title :-  Pune Crime News | Khadak Police arrests criminal in Sarai who threatened and robbed senior citizens