Pune Crime News | कोंढवा : गर्भवती असताना तीनदा तलाक म्हणत विवाहितेला दिला घटस्फोट; ५० लाखाची मागणी करुन केला छळ

पुणे : Pune Crime News | व्यवसायासाठी माहेरहून ५० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करुन विवाहितेला मानसिक व शारीरीक त्रास दिला. तसेच ती गर्भवती (Pregnant) असताना तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हणून घटस्फोट (Divorce) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका कोंढव्यातील २३ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिंचवडमधील तिच्या पतीसह दोन सासु, सासरे, नणंद यांच्यावर मुस्लिम वूमन (प्रोटेक्शन) ऑफ राईट ऑन मॅरेज अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ नोव्हेबर २०२० ते ३० मे २०२१ दरम्यान चिंचवडमधील एम्पायर इस्टेट येथे घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचे पतीचे व्यवसायासाठी तिचे वडिलांकडून ५०
लाख रुपये घेऊन मागणी करुन शारीरीक, मानसिक, आर्थिक त्रास दिला.
पतीचे तिच्यिा इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संभोग करुन क्रुर असह्य त्रास होईल, असे अश्लिल वर्तन केले.
त्यानंतर रागाच्या भरात पतीने फिर्यादीला तलाक, तलाक, तलाक असे ३ वेळा म्हणून आता कुठे जायचे तेथे जा
असे म्हणाला. त्यामुळे फिर्यादी या गर्भवती असताना चुलत्याबरोबर वडिलांच्या घरी निघून आल्या.
शेवटी त्यांनी आता अर्ज केला असून पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Kondhwa: Divorced a married woman by saying talaq thrice while she was pregnant; Tortured by demanding 50 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन