Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी व तिच्या 2 लहान मुलांचा खून करणार्‍याला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या (Immoral Relationship) संशयावरून प्रेयसी आणि तिच्या 2 लहान मुलांचा खून (Murder In Pune) करणार्‍याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक केली आहे. तो तिघांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करून गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime News )

वैभव रूपसेन वाघमारे (26, रा. मु.पो. लोहटा, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने त्याची प्रेयसी आम्रपाली रमेश वाघमारे (24), आदित्य (4) आणि रोशनी (6) यांचा खून केला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 5 एप्रिल रोजी कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil) आणि इतर पोलिस अंमलदार हे कौसरबाग परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पीएसआय पाटील यांना फोनव्दारे माहिती मिळाली की, धर्मावत पेट्रोलपंपाच्या मागील बाजुस महात्मा जोतिबा फुले शाळेजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये 3 मृतदेह जळत आहेत (Triple Murder In Kondhwa Pune). या पध्दतीची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस हवालदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, पोलिस नाईक गोरखनाथ चिकने, जोतिबा पवार, सुजित मदन, संतोष बनसुडे, पोलिस अंमलदार लक्ष्मण होळकर, सागर भोसले आणि सुरज शुक्ला हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. (Pune Crime News)

पत्र्याच्या शेडमध्ये एक स्त्री जातीचे व दोन बालकांचे अर्धवट जळालेले काळे ठिकूर पडलेले व हाडे दिसत असलेले नुकतेच जळालेले मृतदेह त्यांना दिसले. त्याठिकाणी पोलिसांना महिलेचे ओळखपत्र मिळून आले. त्यावरून तिची ओळख पटली. तेथील शाळेच्या पुस्तकांवरून बालकांची नावे आदित्य आणि रोशनी असल्याची माहिती समोर आली. मुलांच्या वहीवर वैभव रूपसेन वाघमारे याचा मोबाईल नंबर मिळून आला. पोलिसांनी परिसरात अधिक चौकशी केली असता वैभव हा आम्रपाली हिच्यासोबत रहात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता वैभव हा हांडेवाडी चौक येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तो हांडेवाडी चौक येथुन बॅगसह गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आम्रपाली वाघमारे हिचे इतर पुरूषांबरोबर अनैतिक संबंध
असल्याच्या संशयावरून तिचा आणि तिच्या दोन मुलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचे
मृतदेह जाळल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तिहेरी
खूनाचा (Triple Murder Case) गुन्हा दाखल आहे.

पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे
(ACP Purnima Taware), कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogale), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले
(PI Sandeep Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील,
पोलिस हवालदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, पोलिस नाईक गोरखनाथ चिकने, जोतिबा पवार, सुजित मदन,
पोलिस अंमलदार संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सागर भोसले व सुरज शुक्ला यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Web Title :-  Pune Crime News | Kondhwa police arrests man who killed girlfriend and her 2 children on suspicion of extramarital affair

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया