Pune Crime News | तडीपार असताना देखील पुण्यात फिरणार्‍याला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तडीपार असताना देखील पुर्वपरवानगी न घेता शहरात वेगवेगळया ठिकाणी फिरणार्‍याला (Tadipar Criminal) कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे. त्याला लुल्लानगर चौकातून अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

जयेश सुनिल भंडारी Jayesh Sunil Bhandari (22, रा. रूख्मिनी निवास, अबन्डंट लाईफ स्कुलच्या मागे, कृष्णानगर, मंहमदवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश भंडारी याला वानवडी पोलिसांकडून (Wanwadi Police Station) पुणे शहरातुन एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे. (Pune Crime News)

 

कोंढवा पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे तडपारी आरोपी आणि रेकॉर्डवरील आरोपी (Criminals On Pune Police Record) चेक करीत होते. त्यावेळी जयेश भंडारी हा लुल्लानगर चौकात उभा असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचुन त्याला अटक केली. त्याच्याकडे शहरात येण्यासाठी त्याने पोलिस उपायुक्त अथवा न्यायालयाची परवानगी घेतली आहे काय याची विचारणा केली असता त्याने कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आली. त्यामुळे त्याच्याविरूध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma),
पोलिस उपायुक्त विक्रम देशमुख (DCP Vikram Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogale),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले (PI Sandeep Bhosale)
यांच्या सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase) आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Kondhwa Police Arrests Tadipar Criminal In Lullanagar Chowk Area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme