Pune Crime News | कोंढवा पोलीस स्टेशन : तडीपार आरोपी अमिर उर्फ चिन्या हत्यारासह गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Crime News | पुणे शहरातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला (Tadipar Criminal Pune) कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याच्याकडून धारदार लोखंडी हत्यार जप्त केले आहे. ही कारवाई कोंढवा येथील बुद्ध विहार समोर करण्यात आली. अमिर उर्फ चिन्या आसीर खान (वय-19 रा. बुद्ध विहार जवळ, काकडे वस्ती, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या (Pune Crime News) आरोपीचे नाव आहे.

 

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाला हद्दीत पेट्रोलिंग करुन तडीपार व रेकॉर्डवरील आरोपी चेक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, राहुल रासगे यांना माहिती मिळाली की, पुणे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार केलेला सराईत गुन्हेगार अमिर उर्फ चिन्या हा त्याच्या घरी आला आहे. तसेच बुद्ध विहार समोर धारदार लोखंडी हत्यार घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बुद्ध विहार येथे सापळा रचून आरोपीला अटक (Arrest) करुन लोखंडी हत्यार जप्त केले. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा (IPS Ranjan Sharma), पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख (DCP Vikram Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त एस.बी. साळवे (ACP S.B. Salve) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle), पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले (PI Sandeep Bhosle) यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravse), पोलीस अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल रासगे, विकास मरगळे, राहुल वझारी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :  Pune Crime News | Kondhwa Police Station: Tadipar Accused Amir alias Chinya with weapon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा