Pune Crime News | ललित पाटील पलायन प्रकरण : ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, जेल डॉक्टर यांच्यावर कारवाई करा, विशेष सरकारी वकीलांचा कोर्टात अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अंमली पदार्थ तस्कर (Drug Peddler) ललित अनिल पाटील (Lalit Anil Patil) पलायन प्रकरणी ससून हॉस्पिटलचे (Sasoon Hospital) संबंधित जबाबदार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे (Shishir Hire) यांनी खेड विशेष कोर्टात (Khed Court) अर्जद्वारे केली आहे. (Pune Crime News)

बहुचर्चित कुप्रसिद्ध अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील व साथीदार यांच्यावर 2020 मध्ये 132 किलो मेथाम्फेटामाइनचे उत्पादन करून विक्री केल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याच्या खटल्यात आज खेड येथील विशेष अंमली पदार्थ व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात आज सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिशिर हिरे यांनी अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 25, 29 नुसार अर्ज दाखल केला आहे. आरोपी ललित पाटील याला ससून हॉस्पिटल मधील जेल कक्षातून अंमली पदार्थांचा व्यापार करण्याची मुभा दिली, आरोपीला कोणत्याही सबळ करणा शिवाय हॉस्पिटलमध्ये आश्रय दिला. त्यामुळे या खटल्यात गुन्हेगारी प्रक्रिया संहिता कलम 311 नुसार संबंधित हॉस्पिटलचे जबाबदार अधिकारी, वैद्यकीय अधिकरी जेलचे डॉक्टर यांना आरोपीं म्हणून जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी केली आहे. (Pune Crime News)

याशिवाय संबंधितांकडून फरार आरोपी ललित पाटील यांचे संपूर्ण जेल रेकॉर्ड (Yerwada Jail Records) ,
हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी भरती असल्याचे रेकॉर्ड, हालचाल नोंद वही मागविण्याबाबत स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे.
विशेष न्यायाधीश यांच्या कोर्टात अ‍ॅड. हिरे यांनी या दोन्ही अर्जावर युक्तिवाद केला. युक्तिवादादरम्यान
अ‍ॅड. हिरे यांनी ससून हॉस्पिटलमध्ये चालणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी कडक भूमिका घेण्याची आवश्यकता
असल्याचे प्रतिपादन केले. या अर्जावर इतर आरोपींचे म्हणणे घेण्यासाठी हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.
पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API Sarika Jagtap | किशोरवयीन मुलींनी व्यक्त व्हावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप