Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अ‍ॅमेझॉनच्या डिलरशिप देण्याच्या आमिषाने 1 कोटींला घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime News | अ‍ॅमेझॉनचा डिलर (Amazon Dealer) असल्याचे सांगून स्वस्तात वस्तू देऊनचे आमिष दाखवून एका व्यवसायिकाला तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी उरुळी देवाची येथील एका ४८ वर्षाच्या व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०४/२३) दिली आहे. यानुसार पोलिसांनी चैतन्य ऊर्फ अंकित भाऊसाहेब पाटील Chaitanya alias Ankit Bhausaheb Patil (वय ३४, रा. कळंबी, ता. मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून ३० मे २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी चैतन्य पाटील याने आपण अ‍ॅमेझॉन डिलर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. गावातील बर्‍याच लोकांना स्वस्तात दुचाकी वाहने, मोबाईल, टि व्ही, फ्रीज, सोन्याची बिस्किटे, चारचाकी वाहनांचे टायर अशा अनेक वस्तू उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. सुरुवातीला फिर्यादी यांना स्वस्तात काही वस्तू दिल्या. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना व त्यांच्या मुलाच्या खात्यावरुन त्याच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडून फिर्यादी यांच्या खात्यावरुन १ कोटी १२ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणत्याही वस्तू न देता पैसे परत न करता फसवणूक (Fraud Case) केली. तक्रार अर्जावरुन लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – 1 Crore Extorted by the Lure of Amazon Dealership

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा