Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – कारवाईच्या भितीने 21 वर्षीय तरूणीची लॉजमध्ये गळफास घेवुन आत्महत्या, हडपसरमधील तरूणाविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कारवाईच्या भितीने 21 वर्षीय तरूणीने वडकी (Wadki) येथील एका लॉजमध्ये छताच्या पंख्याला गळफास (Suicide In Pune) घेवुन आत्महत्या केली आहे. तरूणीस आत्महत्या (Girl Suicide Case) करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये (Loni Kalbhor Police Station) एका तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अक्षय अरूण जोरे Akshay Arun Jore (रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे- Bhekrai Nagar, Hadapsar) असे
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. मेहक सुनिल शिंदे (21, रा. कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या
तरूणीचे नाव आहे. यासंदर्भात महेकची आई शोभा सुनिल शिंदे (53, रा. कोंढवा) यांनी
लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महेक आणि अक्षय जोरे
हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी अक्षय जोरेने, माझेशी लग्न कर नाही तर मी जीव देतो असे म्हणुन
दि. 16 एप्रिल 2023 रोजी स्वतः विषारी औषध पिल्याचा व्हिडीओ महेकच्या मोबाईलवर पाठविला होता.
जर अक्षय मेला तर आपल्यावर कारवाई होईल या भितीने महेकने दि. 16 एप्रिल रोजी रात्री 11 ते दि. 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान वडकी येथील हॉटेल विजयमध्ये बुक केलेल्या रूम नंबर 107 मधील छताच्या पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली. (Pune Crime News)

फिर्यादीने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये (Pune Police) तक्रार दिल्यानंतर अक्षय जोरेविरूध्द आत्महत्या
करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक तरटे (PSI Tarte) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – 21-year-old girl commits suicide by hanging herself in lodge for fear of action, crime against youth in Hadapsar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On PSI And Police Havaldar | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : रेप केस दाखल करण्याची धमकी देत 40 हजाराच्या लाचेची मागणी; पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

MP Supriya Sule | ‘त्या’ प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, म्हणाल्या…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – फोटो पतीला दाखविण्याची, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार