Pune Crime News | गर्दीचा फायदा घेऊन PMPML बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला लोणीकंद पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मागील काही दिवसांपासून गर्दीचा फायदा घेऊन PMPML बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधून मोबाईल, पाकीट चोरीचे (Wallet Stolen) प्रकार वारंवार घडत आहेत. त्या पार्श्वभूमिवर लोणीकंद पोलिसाच्या (Pune Police) तपास पथकाने एका महिलेला वेशांतर करुन अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime News) 3 सप्टेंबर रोजी केसनंद फाटा वाघोली येथे करण्यात आली.

बसमध्ये चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Lonikand Police Station) पोलीस अंमलदार पांडुरंग माने व दिपक कोकरे 3 सप्टेंबर रोजी वेशांतर करुन बसमधून प्रवास करत होते. दुपारी दोनच्या सुमारास एक महिला तिच्या पतीसोबत बसमध्ये चढली. त्यावेळी एका महिले पुरुषाचे पाकिट काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरडा एकून काही अंतरावर असलेल्या पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेला पाठलाग करुन पकडले तर तिच्यासोबत असलेला तरुण गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. महिलेकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या महिलेच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.(Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग (Yerwada Division)
संजय पाटील (ACP Sanjay Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Senior PI Vishvajeet Kaingade), पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (PI Maruti Patil), पोलीस निरीक्षक गुन्हे सिमा ढाकणे (PI Seema Dhakane) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे (API Ravindra Godse), गजानन जाधव (API Gajanan Jadhav) तसेच तपास पथकाच्या पोलीस अंमलदार यांनी केली

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Edible Oil Prices | सणासुदीच्या आधी गृहिणींसाठी आनंदाची बातमी: तेलाच्या किमतीबाबत आली अपडेट

Pune Crime News | खोटे कागदपत्र तयार करुन जागा बळकावली, 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR; पर्वती परिसरातील घटना