Pune Crime News | महिलेला जीवे मारण्याची धमकी देणार्‍यास अटक; अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल

पुणे : लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवल्याने तिला मुल झाले. त्यानंतर पुन्हा तिला गर्भवती केले. आता त्याला दुसरे लग्न करायचे असल्याने महिलेला व तिच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) त्याला अटक केली आहे.

ऋषीकेश एकनाथ कुबेर (वय २५, रा. वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. १९२/२४) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची ओळख होती. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यातून त्यांना दीड वर्षाची मुलगी झाली. त्यानंतरही त्याने फिर्यादी यांना पुन्हा गर्भवती केले. तसेच आता त्याला दुसरे लग्न करायचे आहे. फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करुन तू माझ्यामध्ये येऊ नकोस, असे म्हणत त्यांना मारहाण केली. तुला व तुझ्या मुलीला जीवे मरुन टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटी खाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील तपास करीत आहेत.