Pune Crime News : गंभीर गुन्हे करणार्‍या ओंकार गुंजाळ अन् त्याच्या 4 साथीदारांवर मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गंभीर गुन्हे करणाऱ्या ओंकार गुंजाळ आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्काची कारवाई (Mocca action) केली आहे. शहरात आतापर्यंत 31 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Mocca action) करत गुन्हेगारीला लगाम लावला आहे.

ओंकार शंकर गुंजाळ (वय 24), प्रदीप उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर (वय 23), इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय 19), गणेश रामदास काळे (वय 32) आणि विजय नंदू राठोड (वय 22) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोन महिन्यांपूर्वी (दि. 30 एप्रिल) वाघोली परिसरात एका व्यक्तीला गाडीने कट का मारला.
असे म्हणून भर रस्त्यात अडवून त्याच्याजवळील साडे तेरा लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते.
याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता.
तपास करत असताना त्यांना ओंकार गुंजाळ व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर या टोळीला अटक केली होती.
तर त्यांच्या ताब्यातून 7 लाख 14 हजाराची रोकड व कार, दुचाकी, 4 मोबाईल असा ऐवज जप्त केला होता.

सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार

ओंकार गुंजाळ व त्याचे साथीदार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल आहेत. तर ते बाहेर येताच पुन्हा गुन्हे करत होते. त्यानुसार या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमननुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक गणेश माने यांनी तयार केला होता. तो प्रस्ताव त्यांनी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना पाठवला होता. त्यानंतर प्रस्तावाची छाननी केली. तसेच या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्काची कारवाई केली आहे.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 641 रूग्ण ‘कोरोना’मुक्त