Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, 9 किलो गांजा जप्त; दोघेही कर्नाटकचे रहिवासी

पोलीसनामा ऑनलाइन : Pune Crime News | थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर गांजा (Ganja Selling Racket) विक्रीसाठी आलेल्या दोघांना वाकड पोलिसांनी (Wakad Police) अटक केली. त्यांच्याकडून नऊ किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. (Pune Crime News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल विठ्ठल जाधव (वय २२, रा. गुलबर्गा, कर्नाटक), शालिवान आप्पाराव वाडी (वय ३२, रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. तेथे पोलिसांनी एक संशयित कार अडवली.
कारची झडती घेतली असता त्यात दोन लाख ३१ हजार ५०० रुपयांचा नऊ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी कारमधील राहुल आणि शालिवान या दोघांना अटक केली व मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गांजा
असा एकूण सात लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | nine kg ganja seized in pune pimpari and 2 arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणेकरांना 40 टक्के मिळकत कर सवलत पुन्हा लागू करा; विधी मंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांचे आंदोलन

MLA Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण?

Pune PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांची भरती, सरळसेवा पद्धतीने होणार भरती; जाणून घ्या सविस्तर