Pune Crime News | कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देण्यास ATS कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात पकडण्यात आलेल्या आणि फरार झालेल्या दहशतवाद्याला (Terrorists Arrested in Pune) पुण्यात आल्यानंतर ज्या व्यक्तीने आश्रय देण्यासाठी मदत केली, त्याचे नाव निष्पन्न झाल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorist Squad (ATS) दिली आहे. (Pune Crime News) मात्र, दहशतवाद्यांना पुण्यात आल्यानंतर मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नसून त्याच्याकडे सखोल तपास सुरु असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीला बुधवारी (दि.26) एटीएसने अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी Mohammad Yunus Mohammad Yaku Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले आहे. तर मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam (वय 31) हा फरार झाला आहे. त्याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा एटीएसच्या पथकाकडून शोध सुरु आहे. (Pune Crime News)

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपी हे एन.आय.ए (NIA) कडील गुन्ह्यात फरार असल्याचे समोर आले आहे. तसेच या आरोपींवर प्रत्यकी पाच लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस महासंचालक (DGP) यांनी दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केला आहे. यानंतर एटीएसने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

आरोपीकडे केलेल्या तपासात व आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन कोंढवा येथील एका घरातुन लॅपटॉप, टॅब, वजनकाटा, ड्रोन,
नकाशा, बॅटरीसेल, इलेक्ट्रॉनिक सर्कीट, सोल्डरींग गन व काळ्या रंगाची चकचकीत केमीकल पावडर तसेच वेगगवेगळी उर्दु
व अरेबिक भाषेतील पुस्तके असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेली पावडर ही स्फोटक पदार्थ (Explosives) असल्याबाबत प्राथमिक अहवाल तज्ज्ञांनी
दिला आहे. तसेच आरोपींनी जंगल परिसरात राहण्यासाठी घेतलेले टेन्ट जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेले साहित्य तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे (Forensic Lab) पाठवण्यात आले आहे.

गुन्ह्याच्या तपासामध्ये व आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून आरोपींनी देशाच्या एकतेस,
अखंडतेस व सुरक्षीततेस धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन बॉम्ब (Bomb) बनविण्याचे प्रशिक्षण घेवून
तसेच साहित्य बाळगले आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यात यू.ए.पी.ए. गुन्ह्याचा (Unlawful Activities (Prevention) Act)
अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे.

दरम्यान, कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आल्यानंतर त्यांना आश्रय देणार्‍यास एटीएसने अटक
केली आहे. त्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नसून एटीएस त्याच्याकडे तपास करीत आहे.
तपास पुर्ण झाल्यानंतर आश्रय देणार्‍याचे नाव जाहिर करण्यात येणार असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Governor Nominated MLC | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीलाही संधी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “अजित पवार प्रामाणिक…”