Pune Crime News | पत्नीकडून पतीवर पॉक्सोचा गुन्हा दाखल, सत्र न्यायालयाकडून आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करत पिस्तुलाचा (Pistol) धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) याबाबत गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला असून प्रवीण नागेश जर्दे (PSI Praveen Nagesh Zarde) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रेयसीने तिच्या पती विरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आरोपी पतीला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर (Anticipatory Bail Granted) केला आहे, अशी माहिती अ‍ॅड. किशोर भास्करराव पाटील (Adv. Kishor Bhaskarrao Patil) यांनी दिली.

महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्या कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर त्यांच्या पतीने 14 वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. याबाबत मुलीने सांगितल्यानंतर पतीविरोधात कोथरुड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपी पतीवर आयपीसी 354 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला. (Pune Crime News)

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपीने अ‍ॅड. किशोर पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला.
सुनावणी दरम्यान अ‍ॅड. किशोर पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, अर्जदार यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी दबाव टाकला जात होता.
गुन्हा मागे घेत नसल्याने तक्रारदार महिलेने मुलीचा वापर करुन अर्जदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे.
त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यात कोणतीच चौकशी किंवा कोणताही शोध घेण्याची गरज नाही.
त्यामुळे त्यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्याची गरज नाही. तसेच महिलेने दिलेली तक्रार खोटी आहे.
त्यामुळे अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर करावा.

युक्तिवाद करताना अ‍ॅड. किशोर पाटील यांनी न्यायालयात पीएसआय जर्दे आणि महिलेच्या अनैतिक संबंधाचे पुरावे सादर केले.
हे पुरावे ग्राह्य धरुन अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. पोंक्षे (Judge S.P. Ponkshe) यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात अ‍ॅड. किशोर पाटील यांना अ‍ॅड. किरण उढान (Adv. Kiran Udhan), अ‍ॅड. प्रतिक्षा तरस (Adv. pratiksha Taras) यांनी मदत केली.

Web Title :  Pune Crime News | POCSO case filed against husband by wife, Pre-arrest bail of accused granted by session court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा