Pune Crime News | मोशी येथील स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मोशी परिसरात स्पा सेंटरच्या (Spa Centre Pune) नावाने सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेची सुटका करुन स्पा मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.18) रात्री दहाच्या सुमारास केली आहे.

विशाल तानाजी माने (वय-26 सध्या रा. जाधववाडी पुणे, मुळ रा. मु.पो. बीदाल ता. माण जि. सातारा) याला अटक केली आहे. तर केशव ज्ञानोबा वाघमारे (वय-38 रा. जाधववाडी, मोशी) व एका महिलेवर आयपीसी 370 (3), 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश सिताराम कारोटे (वय-36) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोशी येथील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकून एका महिलेची सुटका करुन स्पा मॅनेजर विशाल माने याला अटक केली. आरोपी पीडित महिलेला पैशांचे आणि दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wakad Crime | कुत्र्याचे पिल्लू घरासमोरून गेल्याने दोन कुटुंबात हाणामारी, वाकड परिसरातील घटना