Pune Wakad Crime | कुत्र्याचे पिल्लू घरासमोरून गेल्याने दोन कुटुंबात हाणामारी, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरासमोरून गेल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना वाकड गावठाण येथे घडली आहे. याप्रकरणी दोन जणांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अशोकनगर, वाकड येथे शुक्रवारी (दि.19) सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे.

याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओमकार किरण वाघमारे (वय-20), महिला आरोपी (वय-40 दोघे रा. मारुती मंदिरा जवळ, अशोकनगर, वाकड गावठाण, वाकड) यांच्यावर आयपीसी 325, 324, 452, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Wakad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी फिर्यादी व त्यांचे पती घरी असताना त्यांच्या कुत्रीचे पिल्लू शेजारी राहणाऱ्या वाघमारे यांच्या घरासमोर गेले. त्याचा राग आल्याने संशयित आरोपी ओमकार वाघमारे याने फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून पतीला हाताने, लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करुन उजव्या हाताचा चावा घेऊन जखमी केले. फिर्यादी यांनी आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ढकलून दिल्याने त्यांच्या कमरेला दुखापत झाल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलिसांना पकडून दिल्याच्या रागातून महिलेचा खून, महिलेसह पतीला अटक; मावळ मधील घटना

Pune Police MPDA Action | हडपसर परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 89 वी कारवाई