Pune Crime News | खूनाचा बदला घेण्यापूर्वी जामिनाच्या पैशाची तरतूद, सराफा व्यावसायिकावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

2 पिस्टल, 5 काडतुस, 3 दुचाकीसह 3 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | साथीदाराच्या खूनाचा (Murder In Pune) बदला घेण्यापूर्वी जामिनाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून पिस्टल (Pistol), काडतुस यासह इतर 3 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.9) रात्री साडेनऊच्या सुमारास आंबेगाव पठार येथील मोकळ्या मैदानात केली. (Pune Crime News)

राधेमोहन उर्फ मुन्ना सिताराम पिसे (वय-19 रा. प्रेमा कॉलनी, वारजे माळवाडी), समीर ज्ञानेश्वर मारणे (वय-20 रा. मारणे हाईट्स, नऱ्हे गाव मुळ रा. मुपो भोडे, मुठा ता. मुळशी) यांच्याकडून पाच काडतुसे आणि दोन लोडेड पिस्टल जप्त केले आहेत. तर अर्जुन मोहन वेलदरे (वय-20 रा. आंबेगाव बु.), तुषार दिलीप माने (वय-19 रा. भेंडी चौक, आंबेगाव बु.), यश मनोज लोहकरे (वय-19 रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार), अनिल दिलीप माने (वय-20 रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव बु.), ओंकार उर्फ मयुर दादासाहेब माने (वय-20 रा. गायमुख चौक, आंबेगाव बु.) यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये दिवाळीची धामधूम सुरु आहे. लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांकडून दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या दागिन्यांचा साठा करुन ठेवला आहे. दरम्यान, सिंहगड रोड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidhyapeeth Police Station) हद्दीतील सराफा व्यावसायिकांच्या दुकानांची रेकी करुन सराईत गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आंबेगाव पठार येथील मोकळ्या जागेतून आरोपींना ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता राधेमोहन पिसे याने त्रिमूर्ती चौकातील सराफा व्यावसायिकावर
दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. मागिल महिन्यात त्याचा सहकारी ओंकार लोहकरे याचा खून करण्यात आला होता. या खुनाचा बदला घण्यासाठी आणि गुन्ह्यामध्ये जामिनाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी दरोडा टाकणार होतो अशी कबुली दिली. आरोपींकडून दोन पिस्टल, 5 काडतुसे, 7 मोबाईल, 3 दुचाकी असा एकूण 3 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 11 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik ), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील
(IPS Praveen Kumar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक
(PI Vijay Puranik), पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता (PSI Dheeraj Gupta),
पोलीस अंमलदार मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी,
आशिष गायकवाड, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश जमदाडे, शैलेंद्र साठा, महेश बारावकर, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे,
मितेश चोरमोले, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital | अखेर वादग्रस्त ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अधिष्ठातापदावरुन हटवलं, उच्च न्यायालयाचा निकाल

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस; विमानतळ परिसरातील घटना