Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस; विमानतळ परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 19 वर्षाच्या तरुणावर विमानतळ पोलीस ठाण्यात (Pune Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2023 मध्ये लोहगाव येथे आरोपीच्या घरी घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत येरवडा येथे राहणाऱ्या 18 वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लोहगाव येथील अनिकेत विजय थोरात (वय-19) याच्यावर आयपीसी 376, 376 (एन) (2), 506 नुसार गुन्हा दाखल करुन हा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) वर्ग केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत थोरात याने फिर्यादी यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून तिला घरी नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध
(Physical Relationship) ठेवले. तसेच आपल्या प्रेमसंबंधाबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केले.
पीडित तरुणी 7 महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी (PSI Chaudhary) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Archies Trailer | जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा ट्रेलर झाला रिलीज, सुहाना खान सोबतचं खुशी कपूर दिसणार दमदार भूमिकेत !

ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

Pune Crime News | कार्य़ालयातील दिव्यांग महिलेचा विनयभंग, विद्युत पारेषण कंपनीच्या अधीक्षक अभियंतासह तिघांवर FIR